वजन कमी करण्याठी उपवास (Intermittent Fasting) करणे हा उपाय सुचवला जातो. परंतु यामुळे वजन कमी होण्याऐवजी वजन वाढू शकते. तर अशा चुका (Weight loss mistakes) कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
लो कॅलरी इनटेक (Low Calorie Intake)
वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही काय खात आहात हे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरी घेणं महागात पडू शकते. लो कॅलरीच्या फंदात वजन देखील वाढू शकते.
कमी प्रथिनांचे सेवन (Low Protein Intake)
शरीराच्या ताकदीसाठी प्रथिने महत्त्वाचे पोषक तत्व आहे. पण, आजकाल लोक वजन लवकर कमी करण्यासाठी काही युक्त्या वापरतात. प्रथिने आणि कॅलरीजच्या कमतरतेमुळे भूक जास्त लागते आणि ती घालवण्यासाठी जास्त खाल्ल्यास वजन वाढू शकते.
निर्जलीकरण (Dehydration)
उपवास करताना झालेल्या चुका तुम्हाला आजारी करू शकतात. या दरम्यान, भूक आणि तहान लागल्याने शरीर डिहायड्रेशनचे शिकार होऊ शकते. पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायूंचा ताण, डोकेदुखी आणि बद्धकोष्ठता देखील होऊ शकते. दिवसातून तीन ते चार लिटर पाणी प्या आणि द्रव्याचे सेवन करा.
अपुरी झोप (Incomplete Sleep)
अधूनमधून उपवास करताना लोक उपाशी राहतात आणि त्यामुळे झोपेच्या सवयी देखील बिघडतात. तुम्ही देखील ही चूक तर करत नाहीयेत ना, पण यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते, आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे तयार होऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.