PM Modi New look: भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी खास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले आहे. ध्वजारोहणानंतर मोदी यांनी देशाला दहाव्यांदा देशाला संबोधित करत आहेत. या कार्यक्रमासाठी जवळपास १८०० पाहुण्यांना दिल्लीत आमंत्रित करण्यात आले आहे. या दिवशी मादींचा खास लूक पाहायला मिळाला आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मोदींनी खास लुक केला आहे. त्यांनी पांढरा कुर्ता, मोदी जॅकेट, केशरी आणि लाल रंगाचा सुंदर वर्क असलेला फेटा घातला आहे. २०१४ पासून स्वातंत्र्यदिनी रंगीबेरंगी फेटा परिधान करण्याची परंपरा मोदी यांनी सुरू केली आहे. लाला किल्यावरील मोदींच्या भाषणासह त्यांनी परिधान केलेल्या कपड्यांची देखील कायम चर्चा असते.
दरम्यान, पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर पोहोचल्यावर तिन्ही दलाच्या तिन्ही तुकड्यांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले.
भारत आज ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे सुरक्षा व्यवस्था कडत करण्यात आली आहे. लाल किल्याभोवती १०,००० हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच १००० कॅमेरे, ड्रोन यंत्रणाही बसवण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.