Covid and Diabetes
Covid and Diabetes Dainik Gomantak
लाइफस्टाइल

COVID and Diabetes : कोव्हिडमुळे लहान मुलांमध्ये मधुमेहाचा वाढता धोका

गोमन्तक डिजिटल टीम

Covid and Diabetes : जगभरातून कोव्हिडचा (Covid 19) प्रभाव ओसरला चालला असला तरी त्याचे मानवी आरोग्यावरील परिणाम विविध अभ्यासांमधून पुढे येतच आहेत. नॉर्वेतील (Norway) एका संशोधनातून (research) लहान मुले आणि किशोरवयीनांमध्ये कोव्हिडमुळे टाईप वन प्रकारच्या मधुमेहाचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. याचे एकूण प्रमाण तुलनेत कमी असले तरी कोव्हिडचा टाईप वन मधुमेहाशी (Type 1 Diabetes) संबंध असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.

नॉर्वेची राजधानी ओस्लो येथील नॉर्वेजियन इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेतील संशोधकांनी हे संशोधन केले आहे. युरोपीयन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबेटीस (EASD) च्या स्टॉकहोम येथे झालेल्या वार्षिक बैठकीत 19 ते 23 सप्टेंबर या काळात हा अभ्यास सादर करण्यात आला.

1 मार्च 2020 नंतरच्या दोन वर्षांच्या काळात 18 वर्षाखालील युवा वर्गात टाईप वन प्रकारचा मधुमेह झाल्याचे निदान कळण्यासाठी संशोधकांनी राष्ट्रीय आरोग्य नोंदणीचाही संदर्भ घेतला. नॉर्वेत 1.2 दशलक्ष युवक आहेत. संशोधकांनी यात कोव्हिडची लागण झालेले आणि न झालेले अशा दोघांचा अभ्यास केला.

संस्थेचे अधिकृत जर्नल 'डायबेटोलॉजिया' ने म्हटले आहे की, या शोधनिबंधांच्या मुख्य लेखक डॉ. हाने लोव्हडाल गलसेथ म्हणतात की, या राष्ट्रव्यापी अभ्यासातून कोव्हिड आणि टाईप वन डायबेटीसचा संबंध असल्याची शक्यता समोर आली आहे. टाईप वन प्रकारच्या मधुमेहात वाढ होण्याचे प्रमाण अजूनही कमी असले तरी ते 0.08 पासून 0.13 पर्यंत वाढले आहे,

टाईप वन मधुमेहाची लक्षणे

गलसेथ यांच्या अभ्यासानुसार कोव्हिडची लागण झालेल्या बहुतांश युवकांपैकी अनेकांमध्ये टाईप वन प्रकारचा मधुमेह (Diabetes) झालेला नाही. पण, डॉक्टर आणि पालकांनी टाईप वन प्रकारच्या मधुमेहाच्या लक्षणांबाबत सतर्क राहिले पाहिजे. या लक्षणांमध्ये सतत तहान लागणे, वारंवार लघवीला येणे, सतत मरगळ वाटणे, थकवा जाणवणे, वजनात अनपेक्षित घट, अशी याची लक्षणे आहेत.

इन्सुलिन निर्मितीत अडथळा आल्याने होतो टाईप वन मधुमेह

टाईप वन प्रकारचा मधुमेह बहुतांश वेळा तरूणांमध्ये आढळून येतो आणि स्वादुपिंडात इन्सुलिन निर्मितीत येणाऱ्या अपयशामुळे तो होतो. श्वासोच्छवासातून झालेले व्हायरल इन्फेक्शन आणि त्याला शरीराच्या प्रतिकारशक्तीने दिलेला मोठ्या प्रमाणातील प्रतिसाद यातूनही टाईप वन प्रकारचा मधुमेह होत असल्याचा संशय आहे.

अलीकडच्या अहवालांनुसार टाईप वन मधुमेह आणि प्रौढांमधील सार्स कोव्ह-२ संसर्गाचा संबंध आहे. तथापि, लहान मुलांध्ये याबाबतचे पुरावे अत्यंत मर्यादित स्वरूपात आहेत. अनुवंशिकता, रक्तातील साखरेची पातळी वाढविणारी औषधे, लठ्ठपणाची मानके या सर्वाचा परिणाम लहान मुलांना कोव्हिड किंवा मधुमेहाची लागण होण्यात होऊ शकतो. सेंटर फॉर डीझीस कंट्रोल अँड प्रीवेन्शनच्या अभ्यासानुसार अमेरिकेतील कोव्हिड झालेल्या मुलांमध्ये मधुमेह होण्याचे प्रमाण अडीचपट होते.

असा झाला अभ्यास...

1 मार्च 2020 ते 1 मार्च 2022 या काळात हा अभ्यास (study) झाला. युवकांना पीसीआर चाचणीतून कोव्हिड झाल्याचे निदान झाल्यानंतरच्या तीस दिवसात टाईप वन प्रकारचा मधुमेह होतो का याचा अभ्यास केला गेला. कोव्हिड झालेल्या आणि कोव्हिड न झालेली लहान मुले आणि किशोरवयीनांचा तुलनात्मक अभ्यास केला गेला.

या दोन वर्षात एकूण 4,24,354 लहान मुलांना कोव्हिडची लागण झाली. त्यातील 990 लहान मुलांना टाईप वन प्रकारचा मधुमेह झाल्याचे आढळून आले.

गलसेथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य नोंदणीकडून नॉर्वेतील सर्व लहान मुले आणि किशोरवयीनांची वैयक्तीक माहिती मिळवली. दररोज अद्ययावत केल्या जाणाऱ्या कोव्हिड चाचणी, कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण आणि रोगनिदान याची माहिती गोळा केली.

महत्वाचे निष्कर्ष

संशोधकांनी त्यांच्या माहितीचे वय, लिंग, मूळ, भौगोलिक भाग, सामाजिक-आर्थिक घटक असे पृथकरण केले. त्यातून कोव्हिड झालेल्या युवकांना कोव्हिड न झालेल्या युवकांच्या तुलनेत 30 दिवसात किंवा त्याहुन अधिक काळात टाईप वन प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता 60 टक्के अधिक होती, असे समोर आले.

युवकांमध्ये टाईप वन प्रकारचा मधुमेह होण्याची शक्यता वाढण्याचे नेमके कारण कळू शकलेले नाही. तसेच कोव्हिडच्या विविध व्हेरियंट्सची लागण झाल्यावर मधुमेह होण्याची शक्यता वाढते की नाही, याबाबत आणखी संशोधनाची (research) गरज आहे.

कोव्हिडवरील उपचारात निष्काळजीमुळे होऊ शकतो मधुमेह

गलसेथ म्हणाल्या की, कोव्हिडवरील उपचारात (remedy) हलगर्जीपणा किंवा निष्काळजीपणा केल्याचा परिणामही मधुमेह होण्याची शक्यता वाढवू शकतो. अनेक अभ्यासात असे समोर आले आहे की, सार्स कोव्ह-2 विषाणू इन्सुलिन निर्माण करणाऱ्या स्वादुपिंडातील बीटा पेशींवर हल्ला करतो, त्यातूनही टाईप वन प्रकारचा मधुमेह होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT