प्रत्येक नात्यात अनेक छोटे-मोठे वाद होत असतात. पण, पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट आणि जवळचे मानले जाते. या नात्यात देखील वाद होत असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे देखील खटके उडतात. पण, आयुष्यात जर परिपक्व पार्टनर असेल तर, हे वाद होणार नाहीत तसेच झालेच तर ते लगेच सुटण्यास मदत होते. त्यासाठी लाईफ पार्टनर मॅच्युअर असणे फार महत्वाचे आहे.
- मॅच्युअर (प्रगल्भ) पार्टनर अधिक अनुभवी असतात. त्यामुळे त्याच्याशी चांगला संवाद साधता येतो. नात्याचा समतोल साधण्यात देखील ते वाकबगार असतात.
- मॅच्युअर पार्टनर अनुभवी असल्यामुळे एखाद्या व्यक्तीशी कसं वागायचं, प्रश्न कसा सोडवायचा हे त्यांना नक्की माहित असतं. स्वत:चं फस्ट्रेशन काढण्यासाठी त्यांना नेहमी पार्टनरसोबत गॉसिप नाही करावं लागत.
- लैंगिक प्रगल्भता (Sexual maturity) हे आणखी एक मुख्य कारण आहे. मॅच्युअर पार्टनरमध्ये अधिक लैंगिक प्रगल्भता असते.
- मॅच्युअर पार्टनर भावनिकदृष्ट्या देखील प्रगल्भ असतात. त्यामुळे चुकून कधी संबंध धोक्यात आले तर बिन कामाचा ड्रामा करत नाहीत. कुणालाच असा तमाशा सहसा आवडत नाही.
- आर्थिक जबाबदारी घेणे, नात्यांमधील आदर, एकमेकांना समजून घ्यायची तयारी यामुळे नाते फुलत असते. मॅच्युअर पार्टनरमध्ये या गोष्टी असतात.
- मॅच्युअर पार्टनर एकमेकांना व्यक्तीगत स्पेस देतात. प्रगल्भतेमुळे त्या रिलेशनशिपमध्ये कोणतीही किरकिर करत नाहीत. नातेसंबंधाचा आदर ठेवतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.