Pregnancy Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Microplastics In Pregnancy: चिंताजनक! गर्भवती महिलांच्या प्लेसेंटामध्ये आढळतयं 'मायक्रोप्लास्टिक्स', नवजात बालकांना धोका; अभ्यासातून खुलासा

Plastic Pollution And Human Health: प्लास्टिकचे कण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक्स गर्भवती महिलेच्या शरीरात पोहोचत राहतात. ज्यामुळे नवजात शिशूचा पूर्ण विकास योग्यरित्या होऊ शकत नाही.

Manish Jadhav

Plastic Pollution And Human Health: आजकाल प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मग तो खाद्यपदार्थ असोत, पाण्याच्या बॉटल्स असोत किंवा इतर कोणतीही वस्तू असो... प्लास्टिकचा वापर प्रत्येक गोष्टीत केला जातो आहे. हेच प्लास्टिक आपल्या आरोग्याला हानी पोहोचवत आहे. प्लास्टिकची वस्तू तुटल्यानंतर छोटे-छोटे कण होतात, ज्याला 'मायक्रोप्लास्टिक्स' असे म्हणतात.

हे कण हवा, पाणी आणि अन्नाद्वारे आपल्या शरीरात पोहोचतात. गर्भवती महिला आणि मुलांनाही या कणांचा त्रास होत आहे. गर्भवती महिलांच्या प्लेसेंटामध्ये हे मायक्रोप्लास्टिक आढळून आल्याची धक्कादायक बाब अलिकडच्या एका अभ्यासातून समोर आली आहे. जे आई आणि गर्भाशयात वाढणाऱ्या बाळासाठी धोकादायक ठरु शकते.

मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय आणि ते शरीरात कसे प्रवेश करते?

मायक्रोप्लास्टिक्स हे प्लास्टिकचे खूप छोटे कण आहेत, जे डोळ्यांनाही दिसत नाहीत. हे आपल्या अन्नपदार्थांमध्ये, पाण्यात आणि अगदी हवेतही असतात. त्याचे छोटे कण शरीरात प्रवेश करत आहेत. जेव्हा हे कण गर्भवती महिलेच्या (Women) शरीरात पोहोचतात तेव्हा ते प्लेसेंटाद्वारे तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला हानी पोहोचवतात. गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर याचा परिणाम होऊ शकतो

बाळाच्या विकासात अडथळा

प्लेसेंटा हा अवयव आहे जो आईपासून बाळाला पोषण आणि ऑक्सिजन पुरवतो, परंतु लहान प्लास्टिकचे कण म्हणजेच मायक्रोप्लास्टिक्स गर्भवती महिलेच्या शरीरात पोहोचत राहतात. ज्यामुळे नवजात शिशूचा पूर्ण विकास योग्यरित्या होऊ शकत नाही. यामुळे मुलाच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो.

हार्मोनल असंतुलन

प्लास्टिकमध्ये (Plastic) अशी रसायने असतात जी हार्मोन्सवर परिणाम करु शकतात, ज्यामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो.

कमकुवत प्रतिकारशक्ती

मायक्रोप्लास्टिक्सच्या संपर्कात आल्याने बाळाची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, ज्यामुळे जन्मानंतर त्याला आजार होण्याचा धोका वाढतो.

कमी वजन

अलीकडील एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात येणाऱ्या नवजात बालकांचे वजन सामान्य वजनापेक्षा कमी होऊ शकते.

आरोग्य समस्या

मायक्रोप्लास्टिक्समुळे मुलांमध्ये दमा, ऍलर्जी आणि मानसिक विकासाशी संबंधित समस्यांचा धोका वाढू शकतो.

मायक्रोप्लास्टिक्स कसे टाळायचे?

मायक्रोप्लास्टिक्स टाळण्यासाठी आपण अनेक उपाय अवलंबले पाहिजेत. ज्यामुळे गर्भवती महिला आणि भावी पिढ्या निरोगी राहू शकतील. प्लास्टिकच्या वस्तू शक्य तितक्या कमी वापरल्या पाहिजेत. खाण्यापिण्यासाठी प्लास्टिकऐवजी काचेची किंवा स्टीलची भांडी वापरावीत.

ताजे आणि नैसर्गिक अन्न खा

अन्न नेहमी ताजे आणि नॅचरल खाल्ले पाहिजे. प्रक्रिया केलेल्या आणि पॅकेज केलेल्या अन्नांमध्येही मायक्रोप्लास्टिक्स असू शकतात, म्हणून ताजे घरगुती अन्नाचे सेवन करा.

शुद्ध पाणी प्या

पाणी चांगल्या फिल्टरमधून गाळून प्यावे जेणेकरुन त्यात असलेले मायक्रोप्लास्टिक्स काढून टाकता येतील. पाणी एका भांड्यात ठेवावे आणि नंतर प्यावे.

प्रदूषण टाळा

धूळ आणि घाणीमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण असू शकतात, म्हणून स्वच्छतेची काळजी घ्या. तसेच बाहेर जातानाही काळजी घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: पर्वरी येथे 'रेंट-अ-कार' आणि टुरिस्ट टॅक्सीचा अपघात; वाहनांचे मोठे नुकसान

Illegal Club House Margao: 'हा कशाचा विकास'? मडगाव येथे भर रस्त्यावरच उभारले ‘क्लब हाऊस’; काँग्रेस आक्रमक

Goa ZP Election: गोवा फॉरवर्डने फोडला प्रचाराचा नारळ! कोलवाळ, हळदोणे, शिरसईत नारीशक्तीचे वर्चस्‍व; सत्तरीतील मतदारसंघांत मोर्चेबांधणी

Yuri Alemao Birthday: ‘नवा गोवा’ घडवूया! वाढदिनी युरींचा संकल्प; व्यासपीठावर विरोधकांची एकजूट, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

Ranji Trophy 2025: तेंडुलकर-वासुकीला विकेट, तरी सौराष्ट्राच्या फलंदाजांचे गोव्यावर वर्चस्व; पहिल्या दिवशी भक्कम धावसंख्या

SCROLL FOR NEXT