Illegal Car Modification: तुम्ही जर तुमची कार इतरांपेक्षा आकर्षक दिसण्यााठी काही बदल करत असाल तर ही बातमी पहिले वाचाच. कारण कारमध्ये तुम्ही केलेले काही बदल तुम्हाला महागात पडू शकते. यामुळे भारतात कारबद्दल कोणते नियम आहेत हे जाणून घेऊया.
कारच्या काचेला काळी फ्रेम वापरू नका
तुम्ही व्हीव्हीआयपी किंवा व्हीआयपी कॅटेगरीमध्ये नसाल तर, तुम्ही कारच्या खिडक्यांना काळ्या काचेची फ्रेम लावु शकत नाही. तसेच, मागील विंडशील्डची दृश्यमानता 70% पेक्षा कमी असल्यास, तुम्हाला दंड भरावा लागेल. तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी गाडीच्या काचांवर सनशेडचा वापर करणेही बेकायदेशीर आहे.
फॅन्सी हॉर्न
नियमांनुसार 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असलेल्या कारमध्ये हॉर्न वापरल्यास दंड भरावा लागतो. असे असूनही, बहुतेक लोक ही चूक करताना दिसतात. हे टाळले पाहिजे.
अलॉय व्हील
कारला कंपनीने दिलेले रिम बदलून मोठ्या साईजचे अलॉय व्हील लावणं धोक्याचं ठरू शकतं. यामुळे गाडीचा लुक चांगला दिसत असला, तरीही अपघात होण्याची शक्यता असते. तसंच असं मॉडिफिकेशन करणं बेकायदेशीर असल्यामुळे तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो.
डिझायनर नंबर प्लेट
भारतात कोणत्याही प्रकारच्या कारवर डिझायनर आणि सुशोभित नंबर प्लेट वापरणे बेकायदेशीर आहे. नवीन नियमांनुसार, आता प्रत्येक कारला उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट त्यावर IND लिहिलेली असणे बंधनकारक आहे. दुसरीकडे, जर तुमच्याकडे जुनी कार असेल, तर त्यावरील नंबर प्लेटवर लिहिलेली अक्षरे स्पष्टपणे समजले असे असावे.अन्यथा पोलिसांकडून तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
जास्त आवाज असलेली सायलेन्सर
अनेक वाहन चालकांना त्यांच्या वाहनासोबत येणारे सायलेन्सर हे मोठ्या आवाजात करून घेतात. असे करणे म्हणजे मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन आहे. कारण त्यामुळे अधिक ध्वनिप्रदूषण होते. याशिवाय, या एक्झॉस्टमधून दरवर्षी घेण्यात येणारी पीयूसी चाचणी देखील योग्य प्रकारे केली जात नाही, जी कोणत्याही वाहनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
चुकीचे लाइट्स
कारचे लाइट्स बदलताना हॅलोजन लाइट्सऐवजी एलईडी लाइट्स वापरावे. पण अनेक वेळा लोक त्यात रंगीबेरंगी लाइट्स लावतात. यामुळे नीट न दिसल्याने अपघात होऊ शकते. तसेच असे करणे म्हणजे नियमांचे उल्लघन करणे होय
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.