Tea Side Effects Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Tea Side Effects: तुम्हीही अति लेमन टी किंवा ब्लॅक टी पिताय? मग वेळीच व्हा सावधान!

आपल्या भारतात भारतात असे बहुतेक लोक आहेत जे आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने करतात.

Kavya Powar

Tea Side Effects: आपल्या भारतात भारतात असे बहुतेक लोक आहेत जे आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने करतात. वास्तविक, बहुतेक लोकांना वाटते की चहा प्यायल्याने आळस दूर होतो.

असेही घडते की चहाच्या पानांमध्ये कॅफिन असते, त्यामुळे चहा प्यायल्यावर काही काळासाठी ताजेपणा जाणवू लागतो. जर एखादी व्यक्ती दिवसातून एक किंवा दोन कप चहा पीत असेल तर त्याचे कोणतेही नुकसान होत नाही.

पण जर एखादी व्यक्ती गरजेपेक्षा जास्त म्हणजे दिवसातून 5-8 कप चहा पिते, तर त्याला पोटाशी संबंधित समस्या आणि आजारांनाही सामोरे जावे लागू शकते.

अति चहा प्यायल्याने होऊ शकतो 'हा' धोका

आपल्याला चांगले आरोग्य राखायचे असेल तर आपल्याला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल. असे बरेच लोक आहेत जे दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी, लेमन आणि ग्रीन टी पितात जेणेकरून त्यांना गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होऊ नये.

पण आपण हे आधी समजून घेतले पाहिजे की जास्त प्रमाणात काहीही खाणे किंवा पिणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. या सर्वांच्या अतिवापराने मुतखडा देखील होऊ शकतो.

ब्लॅक टी किंवा लेमन टी जास्त प्रमाणात घेत असाल तर सावधान....

जर डॉक्टरांनी तुमच्या शरीराची तपासणी केल्यानंतर व्हिटॅमिन सी लिहून दिले असेल तर ते सेवन करणे सुरक्षित आहे, परंतु तुम्ही जर व्हिटॅमिन सीच्या गोळ्या किंवा लेमन टी, ब्लॅक टी किंवा भरपूर लिंबू स्वतःच घेत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

कारण व्हिटॅमिन सी ऑक्सलेटमध्ये मोडते आणि त्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि मुतखडा तयार होतो. तसेच त्याचे प्रमाण शरीरात वाढल्यास यकृताचे आजार, संधिवात यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. मूत्रपिंड निकामी देखील होऊ शकते.

त्यामुळे तुम्ही जर अति लेमन टी किंवा ब्लॅक टी पित असाल तर ही सवय वेळीच थांबवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर 'दक्ष'ची गरुडझेप! परिस्थितीशी झुंज देत गाठलं यश, आता ध्येय 'सीए' होण्याचं, पण आर्थिक मदतीची प्रतीक्षा

Handshake Controversy: 'हॅन्डशेकसाठी आम्ही भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुमपर्यंत गेलो', सलमान अली आगाचा खुलासा; क्रिकेट विश्वाचं वेधलं लक्ष VIDEO

Goa Crime: पोलिस कोठडीत मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या, वाळपई तणाव; पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईसाठी कुटुंबीय आक्रमक

नेपाळच्या 'दीपेंद्र'चा मोठा धमाका! सलग दोनदा 6 चेंडूत 6 षटकार ठोकल्यानंतर आता वनडेत रचला अनोखा इतिहास; गोलंदाजांची उडवली दाणादाण

Goa Drug Case: राहत्या घरी 'गांजा'ची शेती! थिवीच्या रहिवाशाला कोर्टानं सुनावली सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा; सव्वाचार वर्षे चालला खटला

SCROLL FOR NEXT