Tips For Deep Sleep Dainik Gomantak
लाइफस्टाइल

तुम्हीही झोपताना जाड उशी वापरत असाल तर सावधान! होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

Kavya Powar

आपल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे आहे.जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर त्याचा तुमच्या दैनंदिन कामावर नकारात्मक परिणाम होतो आणि तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

अनेकदा असे दिसून आले आहे की, लोक झोपताना सर्वात उशीचा वापर करतात, तर काही लोक उशीशिवाय झोपणे पसंत करतात. याशिवाय काही लोक असे आहेत ज्यांना दोन उशी किंवा जाड उशी वापरल्याशिवाय झोप येत नाही.

जाड उशी वापरून किंवा दोन उशी एकत्र वापरल्याने तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हीही हे करत असाल तर त्याचे तोटे जाणून घ्या.

जाड उशी वापरण्याचे शरीरावर होणारे तोटे

1. झोपताना जाड उशी वापरल्याने मान दुखू शकते. या वेदनामुळे तुमची दैनंदिन कामे कठीण होऊ शकतात. जर तुम्हाला मानदुखीच्या समस्येचा सामना करायचा नसेल तर नेहमी पातळ आणि मऊ उशा वापरा.

2. जाड उशी वापरल्याने मणक्याचे दुखणे देखील होऊ शकते. कारण जाड उशी पाठीचा कणा वळवण्याचे काम करते.

3. जाड उशीचा वापर केल्याने डोके उंचावते, त्यामुळे कवटीत रक्ताभिसरण नीट होत नाही. एवढेच नाही तर केसांना योग्य पोषणही मिळत नाही.

4. जे लोक खूप जास्त उशा वापरतात त्यांना त्यांच्या खांद्यावर आणि हातांमध्ये वेदना होण्याची समस्या उद्भवते. सकाळी उठल्याबरोबर अनेकजण खांदे दुखत असल्याची तक्रार करतात. हे टाळण्यासाठी नेहमी मध्यम आकाराची उशीच वापरावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT