Famous Foods of Lakshadweep: पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर ते खूप चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय बी टाऊनचे सेलिब्रिटीही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत आहेत. सुंदर समुद्रकिनाऱ्याच्या फोटोनंतर आता प्रत्येकजण परदेशी सहलीऐवजी भारतात असलेल्या लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत आहे.
सोशल मीडियावर सर्वत्र लक्षद्वीपची चर्चा होत आहे. तुम्हीही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल तर तिथल्या सुंदर दृश्याचा आनंद घेण्यासोबतच तिथली खाद्यसंस्कृतीही तुम्ही आनंद घेऊ शकता. लक्षद्वीप ज्याला सीफूड प्लेटर म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया कोणते प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत.
ऑक्टोपस फ्राय
ऑक्टोपस फ्राय हा पदार्थ लक्षद्वीपमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. बेबी ऑक्टोपस फ्राय करून हिरवी मिरची, लसूण आणि मीठ घालून शिजवलेले असते. उत्कृष्ट चव आणि सुगंध येण्यासाठी मलबारच्या खास मसाल्यापासून सॉस तयार केला जातो.
मूस कॅवाब
मुस कबाब हे सी फुड लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे. हे हाडेविरहित माशांपासून तयार केले जाते. नारळ, हळद, मिरची पावडर, धने पावडर, विलायची आणि लवंगा यांची पेस्ट तयार करून मासे मॅरीनेट करून हा मूस कावाब तयार केला जातो.
फिश पकोडा
अनेक लोकांना पकोडे आणि भजी खायला खुप आवडतात. लक्षद्वीपमध्ये मिळणाऱ्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडपैकी एक फिश पकोडा नक्की चाखुन पाहा. हाडेविरहित मासे मीठाने मॅरीनेट केले जातात, बेसन आणि हळदीच्या मिश्रणात बुडवून डिप फ्राय केले जातात.
फिश टिक्का
ज्या लोकांना मासे किंवा सीफूड आवडते त्यांना लक्षद्वीपमध्ये मिळणारा फिश टिक्का या पदार्थाचा आश्वाद घ्यायला पाहिजे. मासे पाण्यात धुऊन स्वच्छ केले जातात, नंतर लसूण, आलं, लवंग, मीठ आणि मिरची घालून मॅरीनेट केले जाते आणि तंदूर किंवा ग्रिलमध्ये सर्व्ह केले जाते.
मासु पोडिचाट
मासु पोडिचथ हा लक्षद्वीपमध्ये मिळणारा एक विशिष्ट पदार्थ आहे. हे वाळलेल्या माशांपासून बनवले जाते. माशांचे छोटे तुकडे करून तयार केले जाते. नंतर ते खोबरं, कांदा, लसूण मिरची पावडर, हळद आणि मीठ लावून मॅरेटिन केले जाते. भात किंवा रोटी सोबत आश्वाद घेऊ शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.