Holi 2023| Mobile Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi 2023: स्मार्टफोन पाण्यात पडला तर वेळ न घालवता वापरा 'या' सिंपल ट्रिक

तुमचा फोन पाण्यात पडला तर लगेच करा हे काम.

दैनिक गोमन्तक

Holi Care Tips: रंगाचा सण होळी भारतात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. या सणाचा आनंद घ्यायचा असेल तर घराबाहेर पडावे लागेल. अनेकजण पाण्याने होळी खेळतात. यासोबतच आजकाल लोकांना प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची सवय लागली आहे. 

अशावेळी होळीच्या दिवशी स्मार्टफोनमधून फोटो क्लिक करताना तुमचा फोन पाण्यात पडला, तर तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही. उलट फोन कोरडा करण्याचा विचार करा. यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.

फोन पाण्यात पडला वापरा या ट्रिक्स

तुमचा फोन पाण्यात पडला असेल किंवा ओला झाला असेल तर तो ताबडतोब बंद करावा. फोन बंद नसल्यास शॉट सर्किट होऊ शकते. अशावेळी त्याचे कोणतेही बटण काम करत आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करू नका. फोन (Mobile) लगेच बंद करा.

  • फोन स्विच ऑफ केल्यानंतर त्याचे सर्व एक्सेसरीज वेगळे करा. शक्य असल्यास, बॅटरी किंवा सिम कार्ड आणि मेमरी कार्ड वेगळे करा आणि कोरड्या टॉवेलवर ठेवा. असे केल्याने शॉर्ट सर्किटचा धोका कमी होईल.

  • फोनचे एक्सेसरीज वेगळे केल्यानंतर तुम्हाला फोनचे सर्व भाग सुकवावे लागतील. यासाठी तुम्ही पेपर नॅपकिन वापरू शकता. याशिवाय मऊ टॉवेल वापरू शकता.

  • बाहेरून कोरडे केल्यानंतर फोन आतून सुकणे देखील आवश्यक आहे. यासाठी फोन एका भांड्यात कोरड्या तांदळात दाबून ठेवा. तांदूळ ओलावा लवकर शोषुन घेतो. याशिवाय जर तुमच्याकडे सिलिका जेल पॅक असेल तर तुम्ही ते वापरू शकता. सिलिका जेल पॅक शू बॉक्स किंवा गॅझेट बॉक्स इत्यादींमध्ये ठेवले जातात. ते भातापेक्षा जास्त ओलावा शोषून घेतात. तुम्हाला फोन किमान 24 तास सिलिका पॅक किंवा तांदळाच्या भांड्यात ठेवावा लागेल.

  • 24 तासांनंतर फोन आणि फोनचे सर्व एक्सेसरीज कोरडे झाल्यावर ते चालू करा. जर फोन आता चालू होत नसेल तर तो सेवा केंद्रात घेऊन जावे.

Mobile
  • या गोष्टी करु नका

फोन पाण्यात पडला असेल तर तो ड्रायरने सुकवण्याचा प्रयत्न करू नका.

ड्रायरमधील गरम हवा फोनचे सर्किट वितळवू शकते. 

जर फोन ओला असेल तर त्याचे बटण वापरू नका कारण यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. 

फोन पूर्णपणे कोरडा होईपर्यंत फोनचा हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट वापरू नका. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT