IBS During Pregnancy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pregnancy: गर्भधारणेदरम्यान का होतो IBS? जाणून घ्या लक्षणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

IBS During Pregnancy: गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये आयबीएस (इरिटेबल बोवेल सिंड्रोम) ही एक सामान्य समस्या आहे. आयबीएसमुळे पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठता होते.

Manish Jadhav

IBS During Pregnancy Causes And Prevention

गर्भधारणेदरम्यान महिलांमध्ये आयबीएस (इरिटेबल बोवेल सिंड्रोम) ही एक सामान्य समस्या आहे. आयबीएसमुळे पोटदुखी, गॅस आणि बद्धकोष्ठता होते. आज (10 मार्च) आपण या बातमीच्या माध्यमातून गर्भधारणेदरम्यान महिलांना आयबीएस का होतो आणि त्याचा धोका कसा टाळता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनामिका सिंह यांनी सांगितले की, गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्याचा परिणाम पचनसंस्थेवरही होतो. जर गर्भधारणेदरम्यान महिलेमध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्सची पातळी वाढली तर त्याचा थेट पचनसंस्थेवरही परिणाम होतो.

मसालेदार पदार्थ खाणे टाळावे

डॉ. अनामिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या महिलेला गरोदरपणात (Pregnancy) मानसिक ताण येत असेल तर त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. सीलिएक रोगासारख्या पचनसंस्थेच्या समस्या देखील आयबीएसला कारणीभूत ठरु शकतात. आयबीएसचे मुख्य कारण म्हणजे खाण्याच्या चुकीच्या सवयी. गरोदरपणात जास्त मसालेदार किंवा फॅटयुक्त पदार्थ खाल्ल्याने आयबीएसची समस्या वाढू शकते.

खराब जीवनशैली

जर एखादी महिला (Women) जास्त मैदा, मीठ, साखर खात असेल किंवा तिच्या आहारात प्रथिने आणि जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर हा आजार होऊ शकतो. खराब जीवनशैली देखील या आजाराचे एक कारण आहे. गर्भधारणेदरम्यान महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम किंवा योगा केला पाहिजे.

लक्षणे

महिलांमध्ये आयबीएस खूप सामान्य आहे. ही समस्या प्रत्येक 10 पैकी 4 महिलांमध्ये दिसून येते. तथापि, जर ही समस्या बराच काळ टिकली तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याचा परिणाम महिलेच्या एकूण आरोग्यावर होऊ शकतो. गरोदरपणात दररोज पोटदुखी आणि अपचन यासारख्या समस्या आयबीएसची लक्षणे आहेत.

आयबीएसचा धोका कसा टाळायचा?

दिवसातून कमीत कमी सात ग्लास पाणी प्यावे

आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करावा

मानसिक ताण घेऊ नका

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT