Hypersomnia Causes and Treatment Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hypersomnia: रात्रभर झोपूनही दिवसा झोप येणं असू शकतं आजाराचं लक्षण

कमी-जास्त झोप दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे.

Kavya Powar

Hypersomnia Causes and Treatment: कमी-जास्त झोप दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. काही लोकांना जास्त झोपण्याची सवय असते तर काहींना कमी झोपण्याची सवय असते. काही लोक रात्री 8 ते 10 तास झोपतात पण तरीही दिवसा त्यांना झोप येते.

ही सवय चांगली नाही. ओव्हरस्लीपिंग इफेक्टचे कारण हायपरसोम्निया नावाचा आजार असू शकतो. या आजारात रात्री पुरेशी झोप मिळत असली तरी दिवसा झोप येत राहते. कधी कधी काम करत असतानाही झोप येते. चला जाणून घेऊया हा आजार काय आहे आणि किती धोकादायक आहे.

हायपरसोम्निया कशामुळे होतो

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा आजार नेमका कशामुळे होतो, याबाबत आजपर्यंत कोणतीही अचूक माहिती मिळालेली नाही. तथापि, काही संशोधनातून असे समोर आले आहे की हा आजार अनुवांशिक कारणांमुळे देखील होऊ शकतो. जर कोणी लठ्ठपणाचा बळी असेल तर हा आजार त्याला आपल्या कवेत घेतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये, हे पार्किन्सन रोगामुळे देखील होऊ शकते.

जास्त झोपेची मानसिक समस्या

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, आजकाल लोक मानसिक स्थिती बिघडल्यामुळे डिप्रेशनमध्ये जात आहेत. याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. ज्यामुळे हायपरसोम्नियाचा त्रास होऊ शकतो. ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. परंतु बहुतेक प्रकरणे 30 ते 40 वयोगटातील आहेत.

हायपरसोमनियाचा उपचार

हायपरसोम्नियाची अनेक कारणे असू शकतात. त्याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे एखाद्याला इतरांपेक्षा जास्त झोप लागते. जर तुम्हाला हा आजार झाला असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवावे. तुमच्या वैद्यकीय इतिहासानुसार उपचार केले जातात. म्हणूनच डॉक्टरांपासून काहीही लपवू नका. त्यांना रात्री आणि दिवसा किती वेळ झोपतात याची संपूर्ण माहिती द्या. तुम्ही एखादे औषध घेत असाल तर तेही सांगा. या आजारावर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचारही घेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News Today: वाहतूक सुरळीत करण्यासाठी दिवाडी ते पणजी फेरीसेवा

Indian Navy Goa: भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा आणि मच्छीमार नौकेचा अपघात कसा झाला? महत्वाची माहिती समोर, दोघेजण अद्याप बेपत्ताच

IFFI 2024: 'पौराणिक कथा मिथक नाहीत, ती तर आपली संस्कृती'; ‘महावतार नरसिंह’च्या दिग्दर्शकाने जागवला परंपरांचा अभिमान

Goa Mining: पिळगाव शेतकऱ्यांचे आंदोलन, दिवस सहावा; खनिज वाहतूक व्यवसायाला मोठा फटका, 173 ट्रक खाताहेत धूळ

Saint Francis Xavier Exposition: गोंयचो सायब पावलो!! पाकिस्तानी भाविकांचा गोव्यात येण्याचा मार्ग मोकळा; व्हिसा मंजूर

SCROLL FOR NEXT