Hug Day 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hug Day 2024: जोडीदाराला पहिल्यांदा मिठी मारायची असेल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात

जोडीदाराला पहिल्यादांच मिठी मारत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

hug day 2024 important tips before hugging

फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीक ७ फेब्रुवारीपासून म्हणजेच रोज डेपासून सुरू होतो. रोज डे नंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे आणि नंतर हग डे येतो. प्रत्येक प्रेमळ जोडप्यासाठी हग डे खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी लोक आपल्या जोडीदाराला मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करतात.

मिठी मारल्याने फक्त प्रेमाची भावनाच नाही तर आपुलकीची भावना देखील मिळते. यामुळे मिठी मारण्याला 'जादुकी झप्पी ' असेही म्हणतात. या हग डेवर जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला पहिल्यांदा मिठी मारायची असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

तुमच्या जोडीदाराला पहिल्यांदा मिठी मारताना अस्वस्थ वाटणार नाही याची काळजी घ्यावी. अनेक वेळा असे घडते की मुलं अचानक त्यांच्या पार्टनरला स्वतःहून मिठी मारतात, त्यामुळे मुली खूप अस्वस्थ होतात.

भावना समजून घ्यावी

पहिल्यांदा तुमच्या जोडीदाराला घट्ट मिठी मारू नका. यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू शकते. यासोबत लगेच फॉर्मल हग करू नका, यामुळे तुम्ही फॉर्मॅलिटी करत आहात असेही त्यांना वाटू शकते.

वेळ लक्षात ठेवावी

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला पहिल्यांदा मिठी मारणार असाल तर वेळ लक्षात ठेवावी. त्यांना जास्त वेळ मिठी मारू नका. याशिवाय, अचानक कधीही वेगळे होऊ नका.

डोळ्यात पाहावे

तुमच्या जोडीदाराला पहिल्यांदा मिठी मारण्यापूर्वी डोळ्यात पाहावे. तसेच मिठी मारण्यापूर्वी संवाद साधणे गरजेचे आहे.

जोडीदाराला आनंदी करा

तुमच्या जोडीदाराने तुम्हाला आपोआप मिठी मारावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही भेट देऊन किंवा पहिले प्रशंसा करून आनंदी करू शकता. असे केल्याने तुमचा पार्टनर आनंदी होईल आणि तुम्हाला मिठी मारेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT