how to start a new relationship after a breakup: मला आमचं नातं खूप आवडायचं, मला तो माणूस म्हणून देखील प्रिय होता मात्र अचानक काही कारणांमुळे सगळंच विस्कटलं. अनेक वर्षांचं प्रेम संपलं आणि आम्ही वेगळे झालो, काही दिवस नक्कीच त्यामधून बाहेर पडायला पण आता असं वाटतंय की कोणीतरी नवीन आवडू लागलंय, पण हेच प्रेम असेल कशावरून? मी हे नातं सुरु करावं की नाही समजत नाही. केलं तरीही जुना अनुभव कसा विसरावा, माझ्याकडून कोणत्या चुका नाही झाल्या पाहिजेत, मी यासाठी तयार आहे का? अशा अनेक प्रश्नांनी घर केलंय मनात...
नातं सुरु करणं जेवढं कठीण नसतं तेवढं कठीण त्यामधून बाहेर पडणं मुश्किल असतं. 'ब्रेकअप' अनेक वर्ष सोबत राहिल्यानंतर हा एक शब्द कुठू येतो काय माहिती नाही पण दोन्ही माणसं वेगळी होतात ती कायमची. नातं संपलं म्हणजे आपण वेगळे नक्कीच होतो पण मन विभक्त होतं का? राहून-राहून कित्येक दिवस तेच विचार मन पोखरतात, पण हे सगळं मागे टाकून जर का तुम्ही नवीन नात्याची सुरुवात करणार असाल तर मागे पाहू नका, नक्कीच एक नवीन नातं तुम्हाला सावरेल पण पुन्हा आपण दुखावले जाणार नाही यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कोणत्या? चला जाणून घेऊया.
कुठलंही नवीन नातं सुरु करताना जुन्या नात्याला पूर्णविराम लागला पाहिजे, ज्यामध्ये तुम्ही नवीन नातं सुरु करण्यासाठी पूर्णपणे तयार आहात का याचं उत्तर मिळून जाईल. नवीन नातं सुरु करण्याची कधीच घाई करू नये. आपलं नातं का विस्कटलं, आपण कुठे चूकलो आणि त्या अनिभवातून काय शिकलो हे जाऊन घेतल्यानंरच नवीन नात्याची सुरुवात करावी.
१) तुम्ही भूतकाळ विसरला आहात: जर का तुम्हाला जुन्या चुकांची जाणीव झाली आहे आणि त्या अनुभवनमधून तुम्ही सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शिकण्यास तयार असाल तर नक्कीच दुसऱ्या नात्याचा विचार करू शकता. तुमच्या जुन्या पार्टनरची तुम्हाला मुळीच आठवण सतावत नसेल तर तुम्ही ते नातं विसरला आहात.
२) तुम्ही स्वतःसोबत खुश आहात: एखादं नातं संपल्यानंतर आपल्याला अनेककाळ एकटं वाटत असतं, कुणीतरी सोबत असावं अशी इच्छा असते, मात्र काहीसा वेळ गेल्यानंतर आपण स्वतःमध्ये परिपूर्ण होतो आणि कोणी सोबत असण्याची गरज वाटत नाही.
३) तुम्ही स्वतःला ओळखलं आहे: तुम्हाला हे समजलंय की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, तुमच्या भावना काय आहेत, तुमच्या पार्टनरप्रति काय अपेक्षा आहेत.
४) रिबाउंड शोधू नका: रिबाउंड म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला आणून ठेवणे, म्हणजे तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम असेलच असं नाही.
एखाद्या नात्यात ब्रेकअपनंतर कितीसा वेळ जाऊ द्यावा अशी काही ठराविक मर्यादा नसते. हे पूर्णपणे तुमच्या नात्यावर आणि प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. काही तज्ञांच्या मतानुसार किमान एक महिन्याचा अवधी जाऊ दिला पाहिजे.
१) तुमच्या जुन्या पार्टनरशी नवीन माणसाची तुलना करू नका. नवीन माणूस जसा आहे तसंच त्याला स्वीकारणं केव्हाही चांगलं.
२) ज्या गोष्टी घडून गेल्यात त्याबद्दल विचार करण्यात काहीच अर्थ नाही. यापेक्षा तुमच्या नवीन पार्टनरला संधी द्या,आणि ते काही चुका करतीलच असा गैरसमज करून घेऊ नका.
३) एखाद्याला जाणून घेण्यासाठी पुरेसा वेळ जाऊद्या. कुणावरही दबाव आणू नका आणि नातं सुरु करण्याची घाई करू नका.
१) स्वतःवर लक्ष केंद्रित करा: तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सर्वात महत्वाचं आहे, त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा ताण घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही.
२) जुन्या चुका सुधारा: जुन्या चुकांमधून शिका, मात्र त्याच चुका पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्या.
३) नवीन अनुभव घ्या: तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जा आणि नवीन गोष्टी करून पहा. नवीन लोकांना भेटा.
४) धीर धरा: योग्य व्यक्ती शोधण्यात वेळ लागतो. जर गोष्टी लगेच काम करत नसेल तर निराश होऊ नका.
ब्रेकअपनंतर नवीन नातं सुरु करत असताना सर्वात आधी जुन्या आणि घडून गेलेल्या गोष्टींना मागे टाका, यानंतर तुम्ही स्वतः कसे आहात याचा शोध घ्या, तुमच्या अपेक्षा काय आहेत हे नीट माहिती करून घ्या आणि नवीन नात्यात प्रामाणिक राहा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.