Gmail Tips: जीमेल ही गुगलने तयार केलेली एक ईमेल सेवा आहे. तुम्ही कोणालाही ईमेल पाठवण्यासाठी जीमेल सेवा वापरू शकता. ऑफिसमधील अनेक कामासाठी ईमेलचा वापर केला जातो. तुमच्या मोबाईलमध्ये देखील जीमेलनेच लॉगइन करावे लागते. एवढेच नाही तर फेसबुकपासून ट्विटरपर्यंत अनेक प्लॅटफॉर्मसाठी जीमेल अकाउंट असणे गरजेचे आहे. अनेक लोक याचा वापर करतात पण त्यातील काही फिचर्सबद्दल माहिती नसते. गुगलने एप्रिल 2019 मध्ये त्यांच्या ई-मेल सेवा Gmail मध्ये ई-मेल शेड्यूल फिचर लाँच केले. परंतु अनेक लोकांना अद्याप याबद्दल माहिती नाही. ई-मेल शेड्यूल फीचरचा फायदा घेऊन, तुम्ही तुमच्या सोयीनुसार विशिष्ट वेळी एखाद्याला ई-मेल पाठवू शकता. ईमेल शेड्यूलिंग फिचर मोबाइल अॅप आणि डेस्कटॉप दोन्हीवर उपलब्ध आहे. मोबाईल अॅप आणि डेस्कटॉपवर ई-मेल कसे शेड्यूल करण्यासाठी करावे लागते हे जाणून घेऊया.
डेस्कटॉप वर कसे कराल शेड्युल?
सर्वात पहिले gmail.com वर जा आणि आपले अकाउंट लॉगिन करा.
नंतर जसे तुम्ही मेल पाठवता, त्या व्यक्तीच्या आयडीसह मेल कंपोज करा आणि ड्राफ्टमध्ये सेव्ह करा.
नंतर send वर क्लिक करण्याऐवजी खालील ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा.
नंतर Schedule Send वर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तारीख आणि वेळे सिलेक्ट करावी लागेल.
नंतर वेळ आणि तारीख निवडल्यानंतर, ई-मेल शेड्यूल केला जाईल आणि नियोजित वेळी सेंड केला जाईल.
मोबाईल अॅपवर कसे कराल शेड्युल
तुमचे Android किंवा iOS अॅप ओपन करावे.
आता ई-मेल आयडीसह मेल कंपोजवर क्लिक करा.
त्यानंतर उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट मेनूवर क्लिक करा आणि शेड्यूल सेंडचा पर्याय निवडा.
तुम्ही वेळ आणि तारीख सेट करून ई-मेल शेड्यूल करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.