How to Reverse Aging Dainik Gomantak
लाइफस्टाइल

How to Reverse Aging: वाढत्या वयावर करा मात; कायम तरुण अन् आकर्षक दिसण्यासाठी 'या' सवयींचा होईल फायदा

जर तुम्हालाही साठाव्या वर्षी तरूण आणि आकर्षक दिसायचे असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता.

Puja Bonkile

How to Reverse Aging: नहेमीच तरूण दिसावे असे प्रत्येक महिलेला वाटते. यासाठी अनेक महिला खुप प्रयत्नन देखील करतात. पण काही रिझल्ट मिळत नाही. चेहऱ्यावर वृद्धत्व हे दिसतेच. पण दररोज काही चांगल्या सवयी फॉलो केल्या तर तुम्ही साठाव्या वर्षी देखील तरूण आणि आकर्षक दिसु शकता. या सवयी कोणत्या आङेत हे जाणून घेऊया.

तुमच्या आहारात बदल करा

जर तुम्ही खूप प्रोसेस केलेले पदार्थ खात असाल किंवा साखरेचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला लवरक वृद्धत्व येऊ शकते. संशोधनात केवळ असे आढळले नाही की पोषक समृध्द अन्न दीर्घकाळापर्यंत मेंदूला अधिक चांगले कार्य करण्यास मदत करते. ताजे खाद्यपदार्थ वृद्धत्वाची प्रगती मंद करण्यास मदत करते.

व्यायम करावे

वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे व्यायाम करणे होय. एजिंग सेलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक आयुष्यभर व्यायाम करतात त्यांच्या शरीराचा विकास चांगला होतो. कॉलेस्टेरॉलची पातळी कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी जे तुम्ही सूर्यापासून शोषून घेऊ शकता. त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन डीची उच्च पातळी असलेल्या महिलांमध्ये देखील जास्त काळ टेलोमेर असतात. पेशींमध्ये डीएनएचा शेवटचा भाग असतो जो पेशींचे आयुष्य निर्धारित करतो.

सनस्क्रीन लावावे

सुर्यप्रकाश तुमचे आयुष्य कमी करू शकतो आणि कर्करोग होऊ शकतो. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी (एएडी) नुसार, अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.

भरपूर पाणी प्यावे

भरपूर पाणी पिणे हा वृद्धत्व कमी करण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. पाणी पिल्याने घाम येणे आणि आतड्यांसंबंधी हालचालींद्वारे शरीरातील कचरा काढून टाकण्यास मदत करते, आपले तापमान सामान्य ठेवते.

धुम्रपान टाळा

धूम्रपानामुळे कर्करोग तर होतोच, पण धूम्रपान करणाऱ्यांचे वयही झपाट्याने वाढते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की धूम्रपान तुमच्या त्वचेच्या बायोफिजिकल पॅरामीटर्सवर, विशेषत: त्वचा, एपिडर्मिस आणि नासोलॅबियल फोल्ड्सची जाडी आणि घनता प्रभावित करू शकते.यामुळे ही सवय लगेच बंद करावी.

या गोष्टी लक्षात ठेवा

दातांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.

पुरेशी झोप घ्यावी.

नियमितपणे व्यायम करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT