Evening Snacks Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Evening Snacks: संध्याकाळच्या नाश्त्यात घ्या पनीर पॉपकॉर्नचा आस्वाद

नेहमीचे स्नॅक्स खाऊन कंटाळा आला आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर ट्राय करा पनीर पॉपकॉर्न.

दैनिक गोमन्तक

Evening Snacks Recipe:  जर तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत काही हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स बनवण्याचा विचार करत असाल तर पनीर पॉपकॉर्न नक्की ट्राय करा. लहान मुले असोत की मोठे, सर्व वयोगटातील लोकांना हा पदार्थ खायला आवडेल. संध्याकाळची भूक भागवण्यासाठी पनीर पॉपकॉर्न हा एक उत्तम पर्याय असू शकतो. चला तर मग जाणून घेउया पनीर पॉपकॉर्न कसे बनवावे.

  • पनीर पॉपकॉर्न बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पनीर - 250 ग्रॅम

बेसन - 1 कप

आले-लसूण पेस्ट - 1 टेबलस्पून

हळद - 1/2 टीस्पून

काश्मिरी लाल तिखट - 1/4 टीस्पून

काळी मिरी - 1/4 टीस्पून

बेकिंग सोडा - 1 चिमूटभर

ब्रेड क्रंब्स - 1/2 कप

ओवा - 1/4 टीस्पून

मीठ - चवीनुसार

  • पनीर पॉपकॉर्न कसे बनवावे

पनीर पॉपकॉर्न बनवण्यासाठी सर्वात पहिले पनीरचे तुकडे एका भांड्यात चौकोनी कापून ठेवा. त्यानंतर काश्मिरी लाल मिरची, ओवा, काळी मिरी आणि चवीनुसार मीठ घालून हे मसाले हलक्या हाताने पनीर मध्ये मिक्स करा.

आता दुसरे भांडे घ्या. त्यात बेसन, काश्मिरी तिखट, बेकिंग सोडा, हळद आणि आले-लसूण पेस्ट घालून सर्व काही चांगले मिक्स करा. यानंतर या मिश्रणात थोडे थोडे पाणी घालून जाडसर बॅटर तयार करा आणि चांगले मिक्स करा.

हे लक्षात ठेवा की पीठ नीट गुळगुळीत असावे. आता या बॅटर मध्ये पनीरचे चौकोनी तुकडे बुडवून ब्रेड क्रंबमध्ये चांगले कोट करा आणि तळून घ्या. पनीर सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. त्याच प्रमाणे सर्व पनीरचे चौकोनी तुकडे तळून घ्या. तुमचे पनीर पॉपकॉर्न तयार आहेत. गरमा गरम सर्व्ह करा.

या लोकांनी पनीर खाऊ नये

अतिसाराची समस्या

पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. पण जर हे प्रोटीन शरीरात जास्त असेल तर झिंकची समस्या उद्भवू शकते. दुसरीकडे, जर तुम्हाला आधीच डायरियाची समस्या असेल तर तुम्ही पनीर खाणे टाळावे.

रक्तदाब

जर तुम्ही रक्तदाबाचे रुग्ण असाल तर तुम्ही पनीरचे सेवन करू नये. कारण रक्तदाबाच्या रुग्णांसाठी पनीरचे सेवन चांगले मानले जात नाही. कारण याचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो.

ऍलर्जी

जर तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असेल तर थोडे सावधगिरीने सेवन करा. कारण पनीरचे सेवन केल्याने तुमच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

हृदयरोग

कॉटेज पनीरमध्ये फॅटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे पनीरचे जास्त सेवन केल्यास कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला हृदयाशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागू शकते.

पचनाच्या समस्या

जर तुम्हाला पचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटीशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर झोपताना पनीरचे सेवन करू नका. दुसरीकडे, पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी पनीरचे सेवन टाळावे, अन्यथा तुम्हाला बद्धकोष्ठतेची तक्रार होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

SCROLL FOR NEXT