Dry Clothes In Monsoon Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Dry Clothes In Monsoon: कपडे ओले राहतात, वास सुटतो? पावसाळ्यातील 'ही' झंझट संपवण्यासाठी आजच 'या' ट्रिक्स वापरा

monsoon laundry tips: पावसाळा म्हणजे हिरवळ, थंड हवामान आणि चहा-पकोड्यांचा आस्वाद... पण याच पावसात एक मोठी झंझट आपल्याला सतावते.

Sameer Amunekar

पावसाळा म्हणजे हिरवळ, थंड हवामान आणि चहा-पकोड्यांचा आस्वाद... पण याच पावसात एक मोठी झंझट आपल्याला सतावते. कपडे ओले राहणे आणि त्यातून उग्र वास येणे! ऊन नसल्यानं कपडे वेळेवर सुकत नाहीत, त्यामुळे बुरशी, ओलसरपणा आणि वास यामुळे त्रास होतो. घरातल्या कपड्यांच्या विळख्यात पावसाळा चिडचिडा वाटू लागतो. मात्र चिंता करू नका! खाली दिलेल्या काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही पावसाळ्यातही कपडे कोरडे, स्वच्छ आणि सुवासिक ठेवू शकता.

सतत पाऊस असतो म्हणून कपडे न धुणे शक्य नसते. पण हवामानाचा अंदाज पाहून, ज्या दिवशी पाऊस कमी असतो त्या दिवशीच धुणे शक्यतो करा. हवामान अ‍ॅप वापरा.

2. सुसंगत डिटर्जंट आणि फॅब्रिक कंडिशनर वापरा

कपड्यांना चांगला सुगंध राहावा यासाठी फ्रॅगरन्स युक्त डिटर्जंट वापरा. त्याचसोबत फॅब्रिक सॉफ्टनर (कंडिशनर) वापरल्याने ओलसरपणाचा वास कमी होतो.

3. टॉवेल आणि जाड कपडे वेगळे धुवा

अशा कपड्यांना जास्त वेळ लागत असल्याने हे कपडे स्वतंत्रपणे धुवावेत. शक्य असल्यास त्यांना वॉशिंग मशीनमध्ये स्पिन मोडमध्ये जास्त वेळ फिरवा.

इनडोअर ड्रायिंगसाठी हे वापरा:

  • फॅन किंवा एग्झॉस्ट फॅनखाली वाळवा.

  • गरम पाण्याचे गिझर चालू करून बंद बाथरूममध्ये ड्रायिंग रॅक ठेवा.

  • इनडोअर ड्रायर किंवा ब्लोअर वापरा.

  • गृहसज्जा स्टोअरमध्ये मिळणारे ‘डिह्युमिडिफायर बॉल्स’ वापरा.

सॉक, अंडरगारमेंट्ससाठी एक्सप्रेस ड्राय पद्धती

छोट्या कपड्यांना गरम इस्त्री देऊन वाफेच्या साहाय्याने लवकर वाळवा. यामुळे त्यांच्यात बुरशी होणार नाही.

पडे ठेवण्याआधी पूर्ण कोरडे आहेत याची खात्री करा

थोडाही ओलसरपणा असल्यास कपडे बंद कपाटात ठेवल्यावर वास सुटतो. म्हणून प्रत्येक कपडा नीट तपासूनच ठेवावा.

घरगुती उपाय वापरा

  • कपाटात कॅम्पर (कपूर), कोळसा पावडर, किंवा बेकिंग सोडा ठेवावा. हे पदार्थ आर्द्रता आणि दुर्गंधी शोषून घेतात.

  • लवंग, लिंबाच्या साली, सुगंधी पाउचेस देखील चांगले काम करतात.

8. डेली ड्रायिंग झोन तयार करा

घरात एखादा कोपरा जिथे सतत पंखा चालू ठेवता येतो, तिथे रोज ड्रायिंग झोन ठेवा. गरज पडल्यास ओटीपण वापरू शकता.

9. इस्त्री करण्याआधी वाफ द्या

गरम इस्त्रीने कपड्यांमधील उरलेली आर्द्रता निघते. कपडे नीटस दिसतात आणि बुरशी होण्याचा धोका कमी होतो.

10. वास आले तरी घाबरू नका – 'हे' उपाय करा

कपड्यांमधून वास आला तर ते गरम पाण्यात थोडा व्हिनेगर टाकून परत धुवा. नंतर फॅब्रिक सॉफ्टनर लावा आणि वाफ देऊन वाळवा. वास नाहीसा होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

SCROLL FOR NEXT