Goa Tourism: पर्यटकांचे लोंढे आले की स्थानिकांची गैरसोय होते, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतात, घरे महाग होतात, ट्रॅफिक जाम होते

Overtourism in Goa: इटलीमधल्या व्हेनिस आणि स्पेनमधल्या बार्सेलोना शहरांत ओव्हरटुरीझम विरोधी चळवळ सुरू झाली आहे. व्हेनिस व बार्सेलोना ह्या दोन्ही शहरांना मी भेट दिली आहे.
Overtourism in Goa
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

दत्ता दामोदर नायक

इटलीमधल्या व्हेनिस आणि स्पेनमधल्या बार्सेलोना शहरांत ओव्हरटुरीझम विरोधी चळवळ सुरू झाली आहे. व्हेनिस व बार्सेलोना ह्या दोन्ही शहरांना मी भेट दिली आहे. व्हेनिस हे चारी बाजूंनी समुद्र असलेले व माफक जमीन असलेले बेट आहे. त्याची carrying capacity मर्यादित आहे. ५५,००० लोकसंख्या असलेल्या व्हेनिसमध्ये दुपटीने पर्यटक येतात. त्यामुळे पर्यटकांचे लोंढे आले की स्थानिक लोकांची गैरसोय होते. पर्यटन हंगामात जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढतात. घरे महाग होतात. ट्राफिक जॅम होतो.

बार्सेलोना शहरालाही प्रतिवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. ‘ला राम्बला’ ह्या पादचार्‍यांसाठी राखीव असलेल्या प्रमुख रस्त्यावरून चालणेही दुरापास्त होते.

गोव्यातही पर्यटनाचा अतिरेक चालू आहे. विशेषतः कांदोळीपासून मोरजीपर्यंतच्या किनारी पट्ट्यांत ओव्हरटुरीझमने धुमाकूळ घातला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात इथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

स्थानिक तरुणात व्यसनाधीनता वाढली आहे. ह्या किनारपट्टीतला एकही युवक पदवीधर होण्याच्या फंदात पडत नाही. महाविद्यालयीन शिक्षणापेक्षा हे तरुण पर्यटन संलग्न व्यवसायात घुसतात. ह्या भागात कायद्याचे राज्य नाही. खरे म्हणजे हा भाग म्हणजे state within stateच आहे. त्याचे स्वतःचे कायदे आहेत. नगरनियोजनातील नियमांचे सर्रास उल्लंघन चालू आहे. कॅसिनोमुळे पणजी शहरात तिन्हीसांजेनंतर अशीच वाहतूक कोंडी होते.

पर्यटनाच्या प्रभावामुळे स्थानिक लोकांवर होणार्‍या दुष्परिणामांना अर्थशास्त्रात demonstration Effect अशी संज्ञा आहे. चार दिवसांसाठी येऊन मौजमजा करणार्‍या पर्यटकांचे जीवनशैलीचे स्थानिक लोक अनुकरण करतात.

Overtourism in Goa
Goa: गोवा होणार देशातले पहिले 'Air Sea Tourism Hub'! मुंबईतील परिषदेत खवंटेंचे सूतोवाच; ‘ओपन स्काय पॉलिसी’ची केली मागणी

काही वर्षांपूर्वी गोव्याच्या पर्यटन खात्याने जाहीर केलेले Goa 365 days on holiday हे घोषवाक्य तर भयानकच होते. योग्य वेळी गोव्यातील over tourism बद्दल लाल ध्वज (Red Flag) दाखवणे आवश्यक आहे. गोव्यात येणार्‍या पर्यटकांचा ओघ पूर्वेकडच्या निसर्गरम्य भागांकडे वळवला पाहिजे.

Eco Tourism व Home stayसारख्या योजना आखून अमलात आणल्या पाहिजेत. गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अति विसंबून राहू शकत नाही. गोव्याची अर्थव्यवस्था knowledge economy झाली पाहिजे. लंडन, फ्रँकफर्ट, हाँगकाँगप्रमाणे गोवा आर्थिक व्यवहाराचे केंद्र व्हावे. गोव्यात आंतरराष्ट्रीय Arbitration centre व्हावे. रॉबिटीक्स, ड्रोन्स, इलेक्ट्रिकल वाहने, कृत्रिम बुद्धिमत्ता या सूर्योदयी क्षेत्रात गोव्यात पाऊल टाकावे.

Overtourism in Goa
Goa Tourism: गोवा पर्यटन व्यावसायिकांसाठी खुशखबर! परवाने राहणार 3 वर्षे वैध; CM सावंतांच्या अध्यक्षतेखाली घेतला निर्णय

पर्यटनात न्यूयॉर्क शहरात असलेल्या सेंट्रल पार्कप्रमाणे सांग्यासारख्या तालुक्यात बॉटेनिकल गार्डन व्हावे. जागतिक दर्जाचा Aquarium गोव्यात व्हावा. सर्व नद्यांचे Promanade सुशोभित करावेत. गोव्यात नद्यांच्या किनारी डॅक्स करून हॉलंडप्रमाणे फिशिंग व्हिलेजस करावीत. हॅलीकॉप्टर रायडस असावेत. गोव्यात पर्यटक स्नेही Souvenir उद्योग भरभराटीस यायला हवा. पर्यटन क्षेत्र म्हणून नावाजलेल्या गोव्यातील असेंद्रीय व सेंद्रीय कचरा विशेषतः खेड्यांतून गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यावर सरकारने प्राधान्य दिले पाहिजे.

पर्यटन व्यवसाय गोव्याच्या अर्थव्यवस्थेला पूरक, पोषक व्हावा. ओव्हरटुरीझम टाळण्यासाठी कांदोळी ते मोरजी भागांत यापुढे निवासी हॉटेलांना मर्यादित परवानगी द्यावी. गृहनिर्माण प्रकल्पात पर्यटकांना सदनिका भाड्याने देणे बंद व्हावे. मर्यादित पर्यटन हे वरदान आहे. पर्यटनाचा अतिरेक हा शाप आहे याचे भान आपल्याला असावे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com