mosquitoes|health care tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mosquitoes Bite: डास चावल्यामुळे होते जळजळ ? करून बघा हे घरगुती उपाय

Mosquito Bite Irritation: डास चावल्यास तुम्हाला खाज आणि जळजळ होत असेल तरकरा हे झटपट उपाय त्वचेवर लाल डाग राहणार नाहीत.

दैनिक गोमन्तक

डासांचा (Mosquitoes) धोका पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. हे चक्र दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून हिवाळ्यापर्यत सुरू राहते. काहीवेळा डास अचानक वाढतात, नंतर हवामानातील बदलामुळे ते अचानक गायब होतात. डास चावल्याने त्रास होतोच पण सर्वात त्रासदायक म्हणजे डास चावल्यानंतर होणारी जळजळ. डास चावल्यानंतर 3 ते 15 मिनिटे तुम्हाला जळजळ जाणवू शकते.

यामुळे मन पूर्णपणे अस्वस्थ होते. सर्व लक्ष डास चावण्याच्या ठिकाणी खाज आणि जळजळ यावर केंद्रित होते. कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. घरामध्ये ठेवलेल्या त्या काही वस्तू यापासुन बचाव करू शकतात.

  • डास चावलेल्या ठिकाणी बर्फ लावणे हा उत्तम उपाय आहे.

  • घरात ठेवलेल्या मधाचा एक थेंब घेऊन त्या जागेवर हलके चोळल्यास जळजळ आणि खाज सुटते.

  • एलोवेरा जेल बहुतेक लोक वापरतात आणि हे जेल घरांमध्ये ठेवणे सामान्य आहे. हे जेल तुम्ही डास चावण्याच्या ठिकाणीही लावू शकता.

  • जर तुम्हाला चहा (Tea) पिताना डास चावला असेल तर या चाव्याची जळजळ शांत करण्यासाठी तुम्ही टी-बॅग देखील वापरू शकता.

  • घरात ठेवलेले लिंबू देखील डास चावल्यावर होणारी जळजळ लगेच शांत करण्याचे काम करते.

  • टूथपेस्टमध्येही असे अनेक घटक असतात. जे ही चिडचिड लगेच शांत करण्याचे काम करतात. जसे पुदीना, बेकिंग सोडा किंवा इतर गोष्टींचा अर्क. त्यामुळे डास चावल्यावर तुम्ही टूथपेस्टही लावू शकता.

  • घरी ठेवलेला बेकिंग सोडा चिमूटभर घ्या आणि एक ते दोन थेंब पाण्यात विरघळवून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चाव्याच्या ठिकाणी लावा. जळजळ आणि खाज लगेच कमी होईल.

  • जर तुम्ही ट्रेकिंग किंवा टूर सारख्या परिस्थितीत असाल आणि तुमच्याकडे यापैकी कोणतीही गोष्ट उपलब्ध नसेल, तर तुम्ही पिण्याच्या पाण्याचा वापर करून डास चावण्यापासून होणारा त्रास टाळू शकता. त्या जागेवर थोडे पाणी टाका. खाज पूर्णपणे बरी होणार नाही पण तुम्हाला खूप आराम मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT