Shankha Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Shankha: तुम्ही शंख देवघरात ठेवतायं? शंखाबाबतच्या 'या' गोष्टी ठेवा लक्षात

घरात शंखनाद केल्याने सकारात्मक ऊर्जे संचारते.

दैनिक गोमन्तक

Shankha Tips: घरात शंखनाद केल्याने सकारात्मक ऊर्जे संचारते. तसेच शंख हे माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. देवघरात शंख ठेवणे शुभ मानले जाते. भगवान विष्णू यांच्या हातात देखील शंख पाहायला मिळतो. देवघरात असलेल्या शंखाची पूजा कशी करावी हे जाणून घेउया.

  • धनप्राप्तीसाठी हे काम करावं

असे मानले जाते की घरता शंखु ठेवल्यास धनप्राप्ती होते. यासाठी 107 तांदळांनी शंकाला लाल कपड्यात बांधुन तिजोरीत ठेवावे. असे केल्यास तुमची आर्थिक स्थिती सुधारते असे सांगितले जाते.

  • शंखाच्याबाबत या गोष्टी लक्षात ठेवा

  1. शंखाच्या आत कधीही पाणी ठेवू नका.

  2. शंख जमीनीवरही ठेवू नका.

  3. शंख नेहमी स्वच्छ कपड्यावर ठेवावे

  4. पुजेच्या ठिकाणी शंख ठेवताना त्याचे मुख खालच्या बाजूस आणि उघडा भाग वरच्या दिशेने ठेवावा.

  5. शंख नेहमी भगवान विष्णू, लक्ष्मी यांच्या उजव्या बाजूस ठेवावा.

  • अशी करावी शंखाची पूजा

प्रत्येक वस्तुंची पूजा करण्याचे अनेक नियम असतात. शंखाची पूजा करण्याचेही नियम आहे. आधी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे. त्यानंतर एका पात्रात शंखाला दूध, मध, गंगाजल वस्तुंचा वापर करुन आंघोळ घालावी.

त्यानंतर त्या शंखाला पुन्हा गंगाजलाने धुवावे. त्यावर फुलं, चंदन, केशर अर्पण करावे. त्यानंतर शंखाला धूप दाखवावा. तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर हात जोडावेत आणि शंखाचे ध्यान करावे.

  • शंखपूजनानंतर हे काम करावं

आरतीनंतर पूजेच्या वेळी शंखात ठेवलेले पाणी घरातील प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते. घरातल्या सदस्यांवर हे पाणी शिंपडल्यास शारीरिक आणि मानसिक विकारांपासून दुर राहतो असे मानले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Alvara Land Goa: घरबांधणीसाठी आल्वारा जमिनी विकू नका! CM सावंतांचा इशारा; वाळपईत आधुनिक कृषी कार्यालयाचे उद्घाटन

Air India Flight Hijack Alert: एअर इंडियाच्या विमानात हायजॅकचा इशारा! 250 प्रवाशांचा जीव टांगणीला; जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

Birch Nightclub Fire Case: बर्च प्रकरणात भरपाईचा सुवर्णमध्य निघणार? 20 लाखांच्या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब नाही

Pakistan Poverty Report: खायला अन्न नाही, राहायला घर नाही! पाकड्यांची पोलखोल करणार UNDP रिपोर्ट; 38 टक्के लोक गरिबीच्या खाईत

Goa Water Crisis: गोव्यात पावसाची विक्रमी तूट, तापमान 37 अंशांपार! आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट?

SCROLL FOR NEXT