Valentine's Day Planning: व्हॅलेंटाईन वीक हा नात्यातील गोडवा आणि प्रेम वाढवण्यासाठी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात 7 फेब्रुवारीपासून सुरू होते. व्हॅलेंटाईन डेला महत्त्व आहे कारण तो तुमच्या जोडीदाराप्रती तुमचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करण्याची संधी देतो. लोक हा दिवस आपल्या प्रियजनांना भेटवस्तू, प्रेमपत्रे, फुले देऊन आणि रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये रोमँटिक डिनर देऊन साजरा करतात. जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेसाठी कोणताही प्लॅन बनवू शकत नसाल तर पुढील टिप्सची मदत घेऊन पार्टनरला सरप्राईज देऊ शकता.
व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी करा या 5 गोष्टी
1) कँडललाइट डिनर
व्हॅलेंटाईन डे खास बनवण्याचा एक सरप्राईज कँडललाइट डिनर प्लॅन करू शकता. अनेक रेस्टॉरंट्स व्हॅलेंटाईन डेनिमित्त कँडललाइट डिनरचे आयोजन करतात, परंतु तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीचे पदार्थ देणारे रेस्टॉरंट निवडावे. डिनरदरम्यान केक कापून तुम्ही त्यांना सरप्राईज देऊ शकता.
2) एकत्र शॉपिंग करा
तुम्ही खूप दिवसांपासून शॉपिंगला जाण्याचा विचार करत असाल, पण वेळ मिळत नसेल, तर व्हॅलेंटाईन डे ही सर्वोत्तम संधी असू शकते. दोघेही खरेदीचा आनंद घेऊ शकतात. खरेदीसोबतच तुम्ही तुमच्या पार्टनरला परफ्यूम किंवा मॅचिंग फूटवेअरही गिफ्ट करू शकता.
3) ट्रिप प्लॅन करा
तुमचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही आणि तुमच्या जोडीदारासाठी एखाद्या रोमॅटिक ठिकाणी ट्रिप प्लॅन करू शकता. जर तुमचा जोडीदार एखाद्या ट्रिपला जाण्याची इच्छा व्यक्त करत असेल, तर हे व्हॅलेंटाईन सरप्राईज देण्याची योग्य वेळ आहे.
4) लाँग ड्राईव्ह
जर तुमच्याकडे आणि तुमच्या जोडीदाराकडे कमी वेळ असेल आणि तुम्हाला एकत्र क्वॉलिटी टाईम मिळत नसेल तर तुम्ही तर व्हॅलेंटाईन डेला लाँग ड्राईव्हला जाऊ शकता. यामुळे तुम्हाला एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम घालवता येईल. लाँग ड्राईव्हमुळे मन फ्रेश होईल आणि तुमच्या नात्यात गोडवा वाढेल.
5) मुव्ही डेट
जर तुमच्याकडे व्हॅलेंटाईन डेसाठी काही खास प्लॅनिंग नसेल, तर तुमच्या जोडीदारासोबत मूव्ही डेटवर जाऊ शकता. हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. नवीन चित्रपट प्रदर्शित झाला असेल तर तो पाहायला जाऊ शकता. यामुळे तुम्ही एकत्र क्वॉलिटी टाइमचा आनंद घेऊ शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.