Constipation Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Constipation Home Remedies: 'हे' पदार्थ खाल्याने वाढतील 'Good Bacteria' , दूर होईल बद्धकोष्ठतेचा त्रास

आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.

Puja Bonkile

Constipation Home Remedies: आपले आरोग्य हे पोट चांगले असेल तर निरोगी राहते. यामुळे पचनसंस्था सुरळित कार्य करणे गरजेचे आहे. यासाठी योग्य वेळी पोषक घटकांचा समावेश करणे गरजेचे आहे. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी पढिल गोष्टींची काळजी घ्यावी.

  • प्रोबायोटिक्स फूड खावे

प्रोबायोटिक्स फूडच्या मदतीने चांगले बॅक्टेरिया पोटात जातात. पचनसंस्थेला त्यांची खूप गरज असते. जर तुम्ही दही, ऑलिव्ह, ताक यांसारख्या गोष्टींचे सेवन केले तर पचन तर चांगले होईल. यामुळेच तुम्ही अनेकदा पाहिले असेल की लोक जेवल्यानंतर दही खातात. 

  • फायबर युक्त आहार घ्या

जेव्हा पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवतात तेव्हा डॉक्टर अधिकाधिक फायबर युक्त आहार खाण्याचा सल्ला देतात. हे एक पोषक तत्व आहे, जे पचन सुधारण्यास मदत करते. म्हणूनच तुम्ही नियमितपणे उच्च फायबरयुक्त आहार घ्यावा.

  • भरपुर पाणी प्यावे

जर तुम्हाला तुमची पचन संस्था सुरळित ठेवायची असेल तर शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही हे फार महत्वाचे आहे. बहुतेक आरोग्य तज्ञ शिफारस करतात की निरोगी प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच त्वचा देखील चांगली राहते.

  • लिंबूपाणी

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर यासाठी तुम्ही शरबताचे सेवन करू शकता. यासाठी तुम्ही लिंबूपाणी, नारळपाणी(Coconut Water) आणि ताक यासारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. ते केवळ पोट थंड ठेवत नाहीत तर बद्धकोष्ठता तयार होण्यापासून रोखण्यास मदत करतात. यासोबतच त्यांच्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळीही कायम राहते.

  • चहा आणि कॉफीचे सेवन कमी करा

उपवासा दरम्यान चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करा. चहा-कॉफीमुळे अन्न पचण्यास त्रास होतो, त्यामुळे चहा-कॉफीचे सेवन कमी करा.

  • दही खावे

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दह्याचे सेवन करू शकता. दह्यात प्रोबायोटिक्स देखील असतात, जे पचनक्रिया सुधारतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chodan Bridge: चोडणवासीयांची 33 वर्षांची प्रतीक्षा संपली! 'चोडण पुला'साठी 274.83 कोटींची निविदा, तीन वर्षांत पूर्ण होणार पूलाचं बांधकाम

CM Dev Darshan Yatra: 'मुख्यमंत्री देवदर्शन यात्रे'साठी दहा कोटी रुपयांची तरतूद! मंत्री फळदेसाई यांची माहिती

Arpora Nightclub Fire: 'बर्च क्लब'च्या मालकाचे आणखी काही कारनामे चर्चेत, 'मेझन्स रिसॉर्ट'च्या अग्निशमन 'NOC'चा गैरवापर; चौकशीतून माहिती उघड

South Goa Accident Cases: 'दक्षिणे'त अपघातांचे प्रमाण घटले, 2024 च्या तुलनेत 2025 काहीसे दिलासादायक

Sanjivani Sugar Factory: 'संजीवनी'च्या पुनरुज्जीवन प्रक्रियेला गती, निविदा मुदत 5 फेब्रुवारीपर्यंत वाढवली; प्रकल्पासाठी 4 कंपन्यांकडून उत्सुकता

SCROLL FOR NEXT