Milk And Honey Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Honey Side Effects: 'या' 5 आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी मध घातक

अनेक गोष्टींमध्ये मध मिक्स करून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. पण काही लोकांसाठी मध खाणे धोकादायक ठरू शकते.

Puja Bonkile

Honey Side Effects: मधाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, प्रथिने, फायबर, कॅलरीज आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते. इतकेच नाही तर मधामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म देखील असतात. अनेक गोष्टींमध्ये मध मिक्स करून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळतो. पण काही लोकांसाठी मध खाणे धोकादायक ठरू शकते.

या समस्या असणाऱ्या लोकांनी मध खाऊ नये

पोटासंबंधित समस्या

अनेक लोकांना पोटासंबंधित समस्या असतात. अशा लोकांनी मधाचे सेवन करू नये. कारण यामुळे समस्या आणखी वाढू शकते. पोटाशी संबंधित समस्या जसे की बद्धकोष्ठता, पोटात कॅम्प येणे आणि जुलाब असेल तर मध खाणे टाळावे.

मधुमेह


मध चवीला गोड असते. कारण त्यात नैसर्गिक साखर असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी मध खाणे टाळावे. जर तुम्ही औषधे घेत असाल तर मध खाऊ नका.

स्तनपान करणाऱ्या मातांनी

मधामध्ये बोट्युलिनम आणि ग्रॅनिटॉक्सिन सारखे घटक असतात. स्तनपान करणारी आई मध खाल्ल्यास ते बाळापर्यंत पोहोचते. यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे स्तनपान करणाऱ्या महिलांनी मध खाणे टाळावे.

अॅलर्जी


अॅलर्जीची समस्या असलेल्या लोकांनी मध खाणे टाळा. कारण त्वचेची ऍलर्जी असल्यास मध खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे त्वचेवर लाल पुरळ आणि खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. मध खाल्ल्यानंतर तुम्हाला अशी कोणतीही समस्या येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

रक्तदाब


अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. यामुळे बीपी नियंत्रित करण्यासाठी आपणा औषधे घेतो. जर तुम्ही हाय बीपीचे रुग्ण असाल आणि औषधे घेत असाल तर मध खाऊ नका. मधाचे सेवन केल्याने रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो. ज्यामुळे हृदयाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Responsible Tourism in Goa: त्रास फक्त पर्यटकांनाच होतो, गोमंतकीयांना होत नाही का? बेजबाबदार वर्तनामुळे वादाचे पडसाद

Chorla Ghat Traffic: चोर्ला घाटात जीव धोक्‍यात, डंपरांचा सुळसुळाट! वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोका; बेळगावला खरेदीला जाणं बनलं कठीण

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT