Homemade Face Mask Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Homemade Face Mask: दिवसभर फ्रेश वाटण्यासाठी वापरा 'हे' फेस मास्क

तुम्हाला जर थकल्यासारखे वाटत असल्यास काही घरगुती फेस मास्क चेहऱ्यावर लावू शकता.

दैनिक गोमन्तक

Homemade Face Mask to Feel Fresh: उन्हाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. पण अनेक वेळा कामाता थकवा किंवा झोप न झाल्याने चेहऱ्यावर थकवा दिसतो.

थकलेल्या चेहऱ्यावर तुम्ही तुम्ही काही घरगुती फेस पॅक लावू शकता.हे फेस पॅक कोणते आङेत हे जाणून घेउया.

  • चेहरा फ्रेश वाटावा यासाठी टिप्स

ऑलिव्ह ऑइल, कॉफी आणि मध

एक चमचा मध, कॉफी आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावावी.

हे मास्क कमीत कमी 30 मिनिटांसाठी तसाच ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ करा. हे मास्क आठवड्यातुन २ वेळा लावावा.

गुलाब जल, केळी आणि मध

तुमचा थकलेला चेहरा झटपट चमकदार आणि फ्रेश वाटण्यासाठी अर्ध्या केळीमध्ये 2 चमचे मध मिक्स करुन पेस्ट बनवा. नंतर त्यात गुलाब जलचे काही थेंब टाका आणि नंतर ते चांगले मिक्स करा. स्मूद पेस्ट बनवल्यानंतर हा पॅक संपुर्ण चेहऱ्यावर लावावा.

केळीमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. आणि मध अँटी ऑक्सिडंट्सने भरलेला असतो. हा फेस पॅक त्वचेला फ्रेश आणि चमकदार बनवण्यास मदत करेल.

Face Pack

नारळाचे दूध आणि केशर

केशर नारळाचे दूधाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर तसचे त्वचेसाठी देखील उपयुक्त ठरते. त्याचा पॅक बनवण्यासाठी एक कप नारळाच्या दुधात चिमूटभर केशर सुमारे पाच मिनिटे उकळवून फेस पॅक बनवा आणि थंड होऊ द्या.

त्यानंतर फेसपॅक व्यवस्थित लावावा. थोडा वेळ चेहऱ्यावर ठेवून पाण्याने धुवून घ्यावा.

काकडीचे फेसपॅक

उन्हाळ्यात काकडी खाण्यासह त्वचेसाठी देखील लाभदायी असते. काकडीचा किस करुन चेहऱ्यावर ठेवल्यास चेहरा चमकदार बनतो. तसेच चेहऱ्यावरील थकवा देखील कमी होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT