Home Remedies For Dark Underarms: अनेक महिला अंडरआर्म्समधील केस काढण्यासाठी रेझरचा वापर करतात. पण यामुळे काळे डाग पडतात. तर अनेक महिला ब्लीचिंग आणि व्हॅक्सिंग करून अंडरआर्म्सच्या काळ्या डागांपासून सुटका मिळवतात. पण हे उपचार करण्याआधी तुम्ही पुढील घरगुती उपाय करून पाहा शकता.
हळद आणि लिंबु
काळे डाग घालवण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
यासाठी एका भांड्यात हळद आणि लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करावी.
अंडरआर्म्सवर ही पेस्ट लावावी आणि सुमारे 30 मिनिटानंतर स्वच्छ धुवावे.
हळद आणि लिंबू दोन्ही त्वचा उजळण्यास मदत करतात.
घामामुळे साचलेली घाण आणि दुर्गंधी देखील काढून टाकते .
बटाट्याचा रस
बटाट्यामध्ये त्वचा उजळण्याचे गुणधर्म आढळतात. ज्याचा वापर करून अंडरआर्म्सच्या काळ्या डागांपासून सुटका मिळू शकते.
यासाठी बटाटा किसून घ्यावा. नंतर त्यातील पाणी काढून घ्यावे.
हे पाणी हाताच्या किंवा कापसाच्या मदतीने अंडरआर्म्सवर लावावे.
नंतर 10 मिनिटे ठेवावे आणि स्वच्छ पाण्याने धुवावे.
लिंबूचा वापरा
व्हिटॅमिन सी सोबतच लिंबूमध्ये त्वचा उजळ करण्याचे गुणधर्म देखील आहेत. याचा वापर करून तुम्हाला काही दिवसातच फरक दिसू लागेल.
यासाठी लिंबाचा छोटा तुकडा घ्यावा आणि अंडरआर्म्सवर हळू हळू चोळावा.
10 मिनिटे असेच राहू द्या.
आंघोळ करताना स्वच्छ धुवावे.
नंतर मॉइश्चरायझर लावावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.