Home Decoration Ideas Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Home Decoration Ideas Tips: उन्हाळ्यात घर सजवण्यासाठी 'या' सिंपल टिप्स करा फॉलो

प्रत्येकाला आपले घर अशा प्रकारे सुंदर बनवायचे असते की घरात येणार्‍या व्यक्तीला घर सुंदर दिसले पाहिजे.

दैनिक गोमन्तक

Home Decoration Ideas: प्रत्येकाला आपले घर सुंदर सजवायचे असते. घर सुंदर सजवण्यासाठी प्रत्येक ऋतूनुसार सजावट करणे आवश्यक असते.

उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तुमचे घर सजवायचे असेल तर तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो करु शकता. घरामध्ये असी सजावच केल्यास तुमचेच घर नवे वाटू लागेल.

  •  उन्हाळ्यात घर सजवण्याच्या सोप्या टिप्स

1) भिंतीवर मोठे घड्याळ लावु शकता

जर तुम्हाला चित्रपटांसारखे सुंदर घर हवे असेल तर घराच्या मुख्य सजावटीवर तुम्ही मोठे वॉल क्लॉक लावू शकता. तुम्ही खोलीत रंगीबेरंगी कुशन आणि आरसा देखील लावून सजवु शकता. पण एक लक्षात असु द्या की जास्त वस्तू ठेउ नका.

2) योग्य पडदे लावावे

उन्हाळ्यात (Summer) तुमच्या खिडक्यांना हलक्या रंगाचे पडदे लावावे. तुम्ही न्युड किंवा पेस्टल रंगाचे पडदे वापरू शकता. तुम्ही फ्लोरल प्रिंटचे पडदेही वापरू शकता.
 
3) भिंतींवर सजावट करावी

घर सजवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीं वापरु शकता. घराला एक थंड वातावरण देण्यासाठी, एका भिंतीला वेगळ्या रंगात रंगवा आणि नंतर काही छान डिकल्स वापरा. त्यानंतर तुम्ही त्यांना भिंतीवर चिकटवू शकता किंवा फ्रेम करू शकता. या भिंतीवर तुम्ही बुकशेल्फही लावू शकता.

4) लाइट कलर्स

उन्हाळ्यात जर तुम्हाला फिल्मी स्टाईलमध्ये घर सजवायचे असेल तर घराला नवे रंग द्या. खूप गडद रंग उन्हाळ्याचा हंगाम खराब करतात. यामुळे लाइट किंवा न्युड रंग द्यावे.

5) हँगिंग लाइट्स

तुम्ही घराच्या सजावटीसाठी हँगिंग लाइट्सचा वापर करु शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही प्राचीन किंवा समकालीन डिझाइन्स मिक्स आणि मॅच करू शकता. घराला नवा लुक मिळून घराची शोभा वाढेल.

Home Decoration Ideas
  • उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी वापरा या भन्नाट कल्पना

  1. डेझर्ट कूलर हा उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यास मदत करतो. तुम्ही याचा उन्हाळ्यामध्ये घर थंड ठेवण्यासाठी वापर करू शकता.

  2. उन्हाळ्यात घर थंड ठेवणीसाठी हा सर्वात उत्तम पर्याय आहे. घरातील खिडक्याजवळील पडदे पाण्याने ओले करावे, बाहेरील गरम हवा यामुळे थंड होऊन आत येणार आणि घर थंड राहणार.

  3. मिस्टिंग पंखे अधूनमधून हवेत पाणी उडवतात जे सभोवतालची उष्णता शोषून घेतात आणि बाष्पीभवन झाल्यावर हवा थंड होण्यास मदत करतात. हे पंखे घर थंड ठेवून वेजेची देखील बचत करतात.

  4. उन्हाळ्यात घर थंड राहण्यासाठी तुम्ही एसी लावता पण ज्या रूममध्ये एसी आहे तिच रूम थंड राहते. पूर्ण घर थंड राहण्यासाठी फॅनचा वापर करावा.

  5. उन्हाळ्यामध्ये मंद प्रकाश आलेले लाइट्स वापरावे. विजेची बचत करण्यासाठी LEDs लाइट्स उत्तम आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT