Holi 2024 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi 2024: होळीला आर्थिक तंगीचेही होईल दहन, फक्त अग्नीत अर्पण करा 'या' 5 गोष्टी

holi dahan 2024: होळी दहनाच्यावेळी काही गोष्टी अर्पण केल्यास पैसासंबंधित समस्या दूर होऊ शकतात.

Puja Bonkile

holika dahan 2024 offer these things for happiness and prosperity holi

हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक होळी आहे. दिनदर्शिकेनुसार होळी हा सण फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्ष पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा होळी दहन 24 मार्चला साजरी केली जाणार आहे. होळी दहनाच्या दिवशी अनेक उपाय करून तुम्ही तुमची सुखी जीवनाची इच्छा पूर्ण करू शकता. होळी दहनाच्या वेळी अनेक वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते.

  • विड्याचे पान

होळी दहनाच्या अग्नीत तुपात भिजवलेली विड्याची पाने टाकावीत. होळीच्या अग्नीत सुपारी अर्पण केल्याने आर्थिक संकट दूर होते आणि पैशाची कमतरता भासत नाही. हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा.

  • चंदन

जीवनात सुख-समृद्धी हवी असेल तर होळी दहनात चंदन अर्पण करावे. असे केल्याने तुम्ही जीवनात सतत येणाऱ्या समस्यांवर मात करू शकता.

  • वाळलेले नारळ

तुमचे कोणतेही काम होत नसेल तर बिघडलेल्या कामाची भरपाई करण्यासाठी होळी दहनाच्या आगीत वाळलेले नारळ टाकावे. हा उपाय केल्यास फायदा होईल.

  • कापूर आणि कडुलिंबाची पाने

उत्तम आरोग्यासाठी होळी दहनात कापूर आणि कडुलिंबाची पाने टाकणे शुभ असते. यासाठी 10 कडुलिंबाची पाने, लवंग आणि कापूरचा तुकडा मिकस्स करावे. आगीत फेकण्यापूर्वी ते सात वेळा स्वत:वर फिरवावे.

  • गहू

होळी दहनाच्या वेळी अग्नीत गहू अर्पण करावे. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपादृष्टी कायम राहते होते. अग्नीत धान्य अर्पण केल्याने जीवनात कधीही धान्याची कमतरता भासत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raksha Bandhan: 'या' देवांना राखी बांधा, संकटाना दूर पळवा! जाणून घ्या रक्षाबंधनाचे महत्व

Beach Sports Tourism Hub: आता ऑस्ट्रेलिया, ब्राझीलला जायला नको, गोवाच बनणार 'बीच स्पोर्ट्स टुरिझम हब'! सरकारची नवी योजना

Barabanki Accident: चालत्या बसवर कोसळलं झाड, चालकासह 5 प्रवाशांचा मृत्यू; लोकांनी खिडकीतून उडी मारून वाचवले प्राण Watch Video

Goa Assembly Live Updates: अमेरिकेच्या निर्णयामुळे गोव्याचा महसूल आणि रोजगार घटणार, आमदार वीरेश बोरकर यांचा इशारा

Viral Video: ‘ती’ म्हणेल तेच खरं! पठ्ठ्यानं गर्लफ्रेंडसमोर मित्राला ठरवलं चुकीचं, प्रेमात हरलं लॉजिक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT