Holi  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Special: तुम्हालाही मथुरा-वृंदावनमध्ये खेळायची होळी, तर 'असे' करा ट्रिपचे प्लॅनिंग

Holi Special Trip: तुम्हीही होळी साजरी करण्यासाठी मथुरेला जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्ची लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

holi special 2024 how to plan trip of mathura and vrindavan for holi festival

होळी हा सण आहे ज्याची लोक वर्षभर वाट पाहत असतात. हा सण बंधुभाव, परस्पर प्रेम वाढवतो. दरवर्षी होळी दहन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 09:54 वाजता सुरू होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता संपेल.

देशभरात होळीचा सण मोठ्या उत्सहात आणि आनंदात साजरा केला जातो. पण उत्तर प्रदेशातील गोवर्धन, नांदगाव, मथुरा-वृंदावनमध्ये त्याचा वेगळाच उत्सव पाहायला मिळतो. येथे होळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.

येते 40 दिवस वेगवेगळ्या पद्धतीने होळीचा सण साजरा केला जातो. होळी खेळण्यासाठी दूरदूरहून लोक येथे येतात. तुम्हीही यावेळी मथुरा-वृंदावनमध्ये होळी खेळण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. 

योग्य दिवसाची निवड

जर तुम्हाला वृंदावनाची खरी होळी पहायची असेल तर रंगभरी एकादशीला येथे नक्की भेट द्या. या दिवशी होळीचा सण प्रत्येक रस्त्यावर आणि परिसरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे तुम्हाला लोक केवळ गुलालानेच नव्हे तर पाण्याच्या रंगांनीही होळी खेळताना दिसतील.

आधीच बुकींग करा

येथे होळीसाठी दूरदूरहून लोक येतात. यामुळे जर तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर आधीच हॉटेल बुक करा. इथे गेल्यावर गर्दीमुळे तुम्हाला हॉटेल मिळण्याची शक्यता कमी असते.

महागड्या वस्तू घेऊन जावू नका

येथील मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी असते. होळीचा आनंद घेण्यासाठी दुरवरून अनेक लोक येतात. तुम्हीही यंदा जाण्याचा विचार करत असाल तर महागड्या वस्तु घेऊन जावू नका. तुमच्या गळ्यात सोन्याची चेन अशा काही महागड्या वस्तु असतील तर त्या सोबत ठेऊ नका.

कपड्यांची काळजी घ्यावी

होळी खेळताना कपड्यांची खास काळजी घ्यावी. तुमचे कपडे कम्फर्टेबल नसतील तर गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामुळे सैल असे कपडे सोबत ठेवावे.

सोबत खाद्यपदार्थ घेऊन जावे

होळीच्या दिवशी प्रचंड गर्दी असल्याने हॉटेलमध्ये जेवणासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागू शकते. यामुळे काही अन्नपदार्थ आपल्यासोबत ठेवावे, जेणेकरून आपल्याला उपाशी राहावे लागणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT