Holi Festival Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Holi Festival: रंग बरसे...! होळीचे रंग खेळण्याचेही आहेत अद्भूत फायदे

Holi Festival: रंग खेळताना लोकांमध्येएक वेगळाच उत्साह असतो.विविध रंग पाहून वेगळाच आनंद मिळतो. रंग खेळण्याचे अद्भूत फायदे देखील आहेत.

Puja Bonkile

holi festival 2024 know about amazing benefits of playing color for health mental health

होळी हा रंग आणि आनंदाचा सण आहे. लोक सर्व वाद विसरून एकमेकांना रंग लावतात आणि सण साजरा करतात.पण काही लोकांना रंग खेळायला आवडत नाही अशा लोकांनी याचे फायदे जाणून घेणे गरजेचे आहे.

लाल, निळा, पिवळा, हिरवा, गुलाबी आणि असे अनेक रंग आपल्याला आनंदी आणि सकारात्मक ठेवण्याचे काम करतात. रंगांची संगत ताणतणाव दूर करण्यास मदत करते. रंगामुळे वातावरण प्रसन्न होते आणि उत्साही वातावरण तयार होते.

स्मरणशक्ती सुधारते

अनेक संशोधनांनुसार रंग आपली स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवतात.

आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात

विविध रंगांनी रंगून गेल्यामुळे शरीरात आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. ज्यामुळे तुम्हाला आनंदी राहता. मन मोकळं झालं की आनंदी हार्मोन्स वाढते. यामुळे शारीरिक स्वास्थ्यही सुधारते. आनंदी झाल्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.

तणाव कमी होतो

रंग पाहून मनाला वेगळाच आनंद मिळतो. त्यामुळे तणाव आणि नैराश्यासारख्या समस्या दूर राहतात. तुम्ही जर रंग खेळत नसाल तर यंदा नक्की होळीच्या रंगात रंगून जा.

मित्रता वाढते

होळीच्या रंगात रंगून जाताना मित्रता वाढते. जर तुमचे एखाद्या मित्रासोबत वाद झाला असेल तर या दिवशी रंग लावून वाद संपवा.

एकटेपणा दूर होतो

होळी रंग एकटेपणा दूर करण्यास मदत करतात. आपण मित्र, कुटूंबासोबत एकत्र सण साजरा करतो. यामुळे नात्यात आपुलकी वाढते आणि यामुळे एकटेपणा दूर होतो.

मन आनंदी होते

होळीनिमित्त जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तींना भेटतो तेव्हा मनसोक्त गप्पा गोष्टी होतात. यामुळे मनं आनंदी होते आणि आत्मविश्वास वाढतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT