Pregnancy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pregnancy: गरोदरपणात हृदयविकाराचा झटका आला तर? बाळाच्या जीवाला धोका पोहोचतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Expert Advice On Heart Conditions During Pregnancy: हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलांमध्ये बाळाचे जन्मतः कमी वजन असण्याचा धोका वाढू शकतो. कमी वजनाच्या बाळाला संसर्ग आणि मंद वाढ यासारख्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

Manish Jadhav

गरोदरपणात महिलांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. यादरम्यान जर महिलेला एखादा आजार झाला तर त्याचा बाळावरही परिणाम होतो. गर्भधारणेदरम्यान मधुमेह, थायरॉईडचे आजार सामान्य असतात, परंतु या काळात काही महिलांना हृदयाचे आजार देखील होतात, जसे की, हृदयाचे ठोके कमी होणे, हाय कोलेस्ट्रॉल इत्यादी. अशाप्रकारचे आजार गरोदर महिलांना झाले तर या आजारांचा न जन्मलेल्या बाळावर परिणाम होऊ शकतो का? चला तर मग याविषयी सविस्तररित्या तज्ञांकडून जाणून घेऊया...

दिल्लीच्या राजीव गांधी रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजित जैन सांगतात, हृदयरोगाने ग्रस्त गर्भवती महिलांना (Women) नियमित तपासणी आणि तज्ञांच्या देखरेखीची आवश्यकता असते. जर महिलेला हृदयाचे ठोके अचानक वाढणे किंवा कमी होणे, उच्च रक्तदाब किंवा हृदयात अडथळा येणे यासारखे गंभीर हृदयरोग झाले तर बाळालाही याचा धोका पोहोचू शकतो. हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलांमध्ये अकाली प्रसूतीचा धोका वाढू शकतो. वेळेपूर्वी प्रसूती झाल्याने बाळाला आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

बाळाचे वजन कमी होणे

दिल्ली एम्समधील बालरोग विभागाचे डॉ. राकेश कुमार सांगतात, हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या गर्भवती महिलांमध्ये बाळाचे जन्मतः कमी वजन असण्याचा धोका वाढू शकतो. कमी वजनाच्या बाळाला संसर्ग आणि मंद वाढ यासारख्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. हृदयरोग असलेल्या गर्भवती महिलांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू शकते, ज्यामुळे बाळाच्या वाढीवर आणि आरोग्यावर (Health) परिणाम होऊ शकतो. हृदयरोगासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा बाळावर परिणाम होऊ शकतो. म्हणून, गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन सावधगिरीने औषधे घ्यावीत.

डॉक्टरांच्या संपर्कात राहणे गरजेचे

डॉ. राकेश कुमार सांगतात, जर एखाद्या महिलेला गरोदरपणात हृदयरोग झाला असेल तर तिला आहारापासून लाइफस्टाइलपर्यंत सर्व गोष्टींची काळजी घेणे गरजेचे ठरते. महिलेने नियमितरित्या डॉक्टरांच्या संपर्कात रहावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT