Winter Tips on Healthcare Heart Attack Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Heart Attack: तुमचं हृदय सेफ आहे का? हिवाळ्याच्या दिवसांत हर्ट अटॅकचं प्रमाण वाढतंय; 'हे' उपाय करा, स्वतःची काळजी घ्या

Winter Tips on Healthcare: सध्या सगळीकडेच थंडीचं प्रमाण वाढतंय, किंवा येणाऱ्या काळात आणखीन वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच आज आपण हार्ट अटॅकपासून कसा बचाव करावा यावर माहिती जाणून घेऊया..

Akshata Chhatre

Heart Attack Symptoms and Precautions

सध्या सगळीकडेच थंडीचा महिना सुरु झाला आहे. थंडीला जरी आपण गुलाबी थंडीची उपमा देत असलो तरीही काही लोकांसाठी हीच थंडी जीवघेणी ठरू शकते. या काळात खास करून हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढते, कारण थंडीच्या दिवसांत रक्त प्रवाह आखडतो आणि परिणामी ब्लड प्रेशर वाढतं, ब्लड प्रेशर वाढल्याने हार्ट अटॅकचं येण्याचं प्रमाण देखील वाढतं.

मुळातच थंडीच्या काळात हृदयाला रक्त खेचण्यासाठी, आणि शरीरात उष्णता कायम ठेवण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. सध्या सगळीकडेच थंडीचं प्रमाण वाढतंय, किंवा येणाऱ्या काळात आणखीन वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच आज आपण हार्ट अटॅकपासून कसा बचाव करावा यावर माहिती जाणून घेऊया..

हार्ट अटॅकची लक्षणं कोणती?

एखाद्या रोगाची लक्षणं वेळेतच ओळखली असता त्यावर उपचार करणं सोपं जातं. हार्ट अटॅक सारखा रोग गंभीर असला तरीही त्यावर काबू मिळवता येतो. छातीत दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, चक्कर येणं, खांद्यांमधलं बळ निघून जाणं ही संबंधित रोगाची काही प्रमुख लक्षणं आहेत. लक्ष्यात घ्या तुमचं वय काय आहे यावरून तुम्हाला हा त्रास होईल की नाही हे सांगता येत नाही, मात्र वयस्कर माणसांना हार्ट अटॅकचा धोका अधिक असतो यात दुमत नाही.

45 वर्षांपेक्षा अधिक पुरुष आणि 55 वर्षांपेक्षा अधिक महिलांमध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. शिवाय तुमच्या घरात जर का कोणी हार्टचा रुग्ण असेल तर हा आजार तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो.

आपण नेमकं कसं आयुष्य जगतोय, काय खातोय-पितोय, यावर देखील आजार होतील की नाही हे बऱ्यापैकी निर्भर करतं. किंवा तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीस, हाय केलेस्टरॉल यांसारखे आजार असतील तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढू शकते.

हर्ट अटॅकवर मात कशी करावी?

अनेकवेळा रोजगाच्या संबंधित काही घटक आपल्या हातात असतात तर काहींवर आपण उपाय करु शकत नाही. हिवाळ्याच्या दिवसांत आपोआप शरीराला आळस यायला सुरुवात होते, आपण काम करू नये असं वाटू लागतं, मात्र तुमच्या शरीराची सतत हालचाल होणं घरजेचं आहे हे विसरू नका. तुम्ही यासाठी दररोज व्यायाम करू शकता किंवा एखादा आवडीचा खेळ खेळू शकता.

अनेकवेळा आजर हे चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे उध्द्वभवतात, अशावेळी आपण कोणता आहार घेतोय हे तपासून पहा, हिवाळ्याच्या दिवसांत आपल्या शरीराला अधिकाधिक उष्णता प्रदान करतील अशा खाद्यपदार्थांचे सेवन करा. बेहरची थंडी सहन होत नसले तर शक्य तेवढं बाहेर जाणं टाळा, गरम कपडे वापरा आणि सर्वात महत्वाचं म्हणेज या काळात मद्यपान करणं थांबवा, मद्यपानामुळे हृदयावर प्रेशर येण्याची शक्यता अधिक असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT