Heart Attack Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Heart Attack: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' इशारे;अशी घ्या काळजी

Heart Attack: हृदयाला धमन्याद्वारे रक्ताचा पुरवठा होतो.

दैनिक गोमन्तक

Heart Attack: अलिकडे हार्ट अ‍ॅटॅकमुळे लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक दिग्गज आणि प्रसिद्ध व्यक्ती, बॉलीवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

बदलती जीवनशैली, अयोग्य जीवनशैली , शरीराला आवश्यक घटकांची कमतरता आणि तणाव यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे.

अचानक येणाऱ्या हार्ट अ‍ॅटॅकमुळे लोकांच्या मनात याविषयी भीती निर्माण झाली आहे. हृदयाला धमन्याद्वारे रक्ताचा पुरवठा होतो . जर या धमन्या काही अंशी किंवा पूर्णपणे ब्लॉक झाल्यातर हृदयविकाराचा धोका वाढतो.

आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडत असतो की हार्ट अ‍ॅटॅक येणार आहे हे कसे समजू शकते? म्हणून आज आपण जाणून घेऊयात की हार्ट अ‍ॅटॅक येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काय संकेत देत असते. असा संकेत जर मिळाला तर काय केले पाहिजे.

  • हार्ट अ‍ॅटॅकपूर्वी हा मिळतो संकेत

हृदयाच्या धमण्या ब्लॉक झाल्यावर आपल्याला छातीमध्ये जड वाटू शकते. तुम्ही थोडे मेहनतीचे काम केले तर तुम्हाला दम लागणे, छातीत दुखणे , गुदमरणे, अस्वस्थता आणि बैचेनी वाटू शकते.

थकवा जाणवणे, श्वासाची गती वाढणे, हृदयाची धडधड वाढणे अशा प्रकारचे संकेत तुमच्या धमण्या तुम्हाला देत असतात. याशिवाय हृदयाचे इतर आजार, मधुमेह आणि हाय बल्ड प्रेशर यामुळे छातीतल्या दुखण्यामुळे हार्ट अ‍ॅटॅकचे प्रमाण वाढू शकते.

heart care
  • जर तुम्हाला असे संकेत मिळाले तर काय करावे

तुम्हाला असे काही संकेत मिळाले तर त्वरित तुम्ही कार्डियोलॉजिस्टकडे गेले पाहिजे. याशिवाय तुम्हाला जर मधुमेह, हाय ब्लडप्रेशरचा त्रास होत असेल तर तुम्ही हृदयाचे पूर्ण चेकअप करुन घेतले पाहिजे.

  • हार्ट अ‍ॅटॅक आल्यावर काय करावे

हार्ट अ‍ॅटॅकच्या सुरुवातीच्या संकेतामध्ये छातीमध्ये जडपणा येणे, असह्य वेदना होणे , तोंड ,पाठ आणि डाव्या हातात झिणझिण्या येणे, घाम येणे आणि अस्वस्थ वाटते. अशा परिस्थितीत तुम्हाला लगेच मदत मिळण्यासाठी एमरजन्सी मेडिकल हेल्प लाइन नंबर वर लगेच कॉल करा. वैद्यकीय मदत मिळेपर्यत रुग्णाला तुम्ही एस्पिरिनची गोळी देऊ शकता.

  • हार्ट अॅटॅक वर कोणते उपचार उपलब्ध आहेत

ज्यांना 70 टक्केपेक्षा कमी ब्लॉकेज आहे त्यांचा उपचार औषधगोळ्यांनी होऊ शकतो. मात्र ज्यांना 75 टक्केपेक्षा जास्त ब्लॉकेज आहे त्यांचा उपचार एंजियोप्लास्टी किंवा बाईपास सर्जरीद्वारे केला जाऊ शकतो

  • हृदयाला असे ठेवा निरोगी

1. तंबाखूचे सेवन बंद करा.

2. दारुपासून दूर राहा.

3. मधूमेह , हाय ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांनी नियमित चेकअप केले पाहिजे.

4. तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

5. दररोज कमीतकमी 7-8 तास चांगली झोप घ्या.

5. सकस आहार घ्या.

8. जंकफूड, जास्त मीठ असलेले पदार्थ खाणे टाळा.

9. वजन( Weight ) नियंत्रणात ठेवा.

10. नियमित व्यायाम करा. आठवड्यातले 5 दिवस 35-45 मिनिट तुम्ही चालण्याचा व्यायाम करु शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sara Tendulkar: शुभमन गिलला दिला धोका? सारा गोव्यात कोणासोबत करतेय मज्जा? 'त्या' तरुणासोबतचे फोटो झाले VIRAL

सांगोडोत्सव गाजला! मांडवीच्या पाण्यावर रंगला 'खुनी हनिमून', 'छावा' आणि ‘शरभ अवतार' देखाव्यांची जोरदार चर्चा; Watch Video

Pitru Paksha 2025: ‘या’ दिवशी सुरू होतोय पितृ पक्ष, पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या तारीख आणि नियम

Cricketer Retierment: आशिया कपपूर्वी भारताच्या 'या' स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम, IPLमध्ये 3 वेळा घेतलीय हॅटट्रिक

Court Ruling: लग्न केलं म्हणून बलात्काराचा खटला रद्द; किशोरवयापासून होते प्रेमाचे संबंध

SCROLL FOR NEXT