Honey vs Sugar: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Honey vs Sugar: साखरेपेक्षा मधाचे सेवन आरोग्यदायी असे का म्हटले जाते? वाचा 'ही' 6 कारण

साखर आणि मध दोन्ही फ्रक्टोज आणि ग्लुकोजपासून बनतात. मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात तर साखर खाल्याने शरीराला मधुमेहासह अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागु शकते.

Puja Bonkile

Honey vs Sugar: स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ आहेत की ज्यामुळे आरोग्य देखील निरोगी राहते. या पदार्थांमध्ये मधाचाही समावेश होतो, जो अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध मानला जातो. 

हजारो वर्षांपासून मधाचा वापर नैसर्गिक साखर म्हणून केला जात आहे. आजही बरेच लोक साखरेऐवजी मधाचे सेवन करणे चांगले मानतात. मधामध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आता प्रश्न असा आहे की साखरेपेक्षा मध खरोखरच लाखपटीने चांगला आहे का? 

साखर आणि मध दोन्ही फ्रक्टोज आणि ग्लुकोजपासून बनलेले असतात. मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. साखरेचे सेवन केल्यास शरीराला मधुमेहासह अनेक गंभीर आजार देऊ शकते. चला जाणून घेऊया साखरेपेक्षा मध का चांगला आहे?

साखरेपेक्षा मध चांगले का?

1. भरपूर पोषण

मधामध्ये (Honey) अनेक आवश्यक पोषक आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. साखर प्रक्रिया केलेले कार्बोहायड्रेट आहे. ज्यामध्ये पोषक तत्वांचा अभाव असतो. मधामध्ये अमिनो अॅसिड्स, एन्झाईम्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.

जे शरीराला वेगवेगळ्या प्रकारे फायदे देतात. जसे की रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) मजबूत करणे, जळजळ होण्याच्या समस्येपासून बचाव करणे आणि जखमा लवकर भरणे यासारखे फायदे होतात.  

2. कमी ग्लायसेमिक निर्देशांक

साखरेच्या तुलनेत मधाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असतो. याचा अर्थ असा होतो की ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचे टेन्शन नसते.

3. पचन व्यवस्था सुरळित कार्य करते

मध पचायला कठीण नाही. कारण त्यामध्ये एंजाइम असतात. जे कर्बोदकांमधे तोडण्याचे काम करतात. साखर रक्तप्रवाहात प्रवेश करते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढवण्याचे काम करते. 

4. लो-कॅलरी

मध गोड असला तरी साखरेच्या तुलनेत त्यात कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. तुम्हाला कमी कॅलरीसोबत गोडपणा हवा असेल तर तुम्ही मधाला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.

5. एनर्जी बूस्टर

फ्रक्टोज आणि ग्लुकोज सारख्या नैसर्गिक शर्करा मधामध्ये आढळतात. ज्यांना प्रत्यक्षात ऊर्जा बूस्टर मानले जाते. हे शरीराद्वारे सहजपणे शोषले जाते आणि त्वरित ऊर्जा प्रदान करते. तर साखर शोषून घेण्यासाठी शरीराला प्रथम ती फ्रक्टोज आणि ग्लुकोजमध्ये मोडावी लागते.  

6. त्वचेसाठी फायदेशीर

मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जे पिंपल्स, सूज यासारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. जास्त साखर खाल्ल्याने ग्लायकेशनचा त्रास होऊ शकतो.

7. वजनावर नियंत्रण

साखर खाल्यानेस वजन वाढू शकते. पण मधाचे सेवन नियमितपणे सकाळी कोमट पाण्यात केल्यास वजन नियंत्रणात ठेवता येते.  

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT