Weight Loss  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Life: जिरं,ओवा, हिंग आणि बडीशेप पावडरचा असा करा वापर, झटक्यात होईल वजन कमी

जिरं,ओवा, हिंग आणि बडीशेप या चारही गोष्टी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले देशी मसाले म्हणून वापरतात. यांचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते.

Puja Bonkile

अवेळी खाण्याच्या सवयी आणि धावपळीच्या लाइफस्टाइलमुळे लठ्ठपणाची समस्या आजकाल सामान्य झाली आहे, तर लठ्ठपणा हेच अनेक रोगांचे मूळ आहे. यामुळे निरोगी राहण्यासाठी लठ्ठपणापासून मुक्ती मिळणे खूप गरजेचे आहे. परंतु अनेक वेळा खूप प्रयत्न करूनही लोक लठ्ठपणापासून मुक्त होऊ शकत नाहीत आणि तणावग्रस्त होतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी ओवा,हिंग,जिरं आणि बडिशेपच्या पावडरचे सेवन करू शकता.

  • या पावडरचे सेवन कसे करावे

यासाठी एका भांड्यात जिरं, बडीशेप, हिंग आणि ओवा हलके भाजून घ्या आणि नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे. या पावडरचे दररोज कोमट पाण्यासोबत सेवन करावे. यासाठी तयार मिश्रणाची एक चमचा पावडर एक कप गरम पाण्यात मिसळून रोज प्या. या पावडरचे नियमित सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्यासोबत सेवन करा.

  • कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी जिरं फायदेशीर

जिरं स्वतःच एक अतिशय शक्तिशाली आणि फायदेशीर मसाला आहे. लोहासोबतच तांबे, कॅल्शियम आणि पोटॅशियम यांसारखी खनिजेही त्यात मुबलक प्रमाणात आढळतात. त्याचबरोबर यामध्ये व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी देखील चांगल्या प्रमाणात आढळते. जिरं खाल्ल्याने अपचन, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता तसेच पचनाच्या समस्या दूर होतात. तसेच हे खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी देखील उपयुक्त आहे, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

  • ओवा पचनसंस्था सुरित ठेवते

या पावडरमध्ये वापरला जाणारा दुसरा मसाला ओवा देखील अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. ओव्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रियेवर सकारात्मक परिणाम होतो आणि त्याच्या मदतीने शरीरात जमा झालेली चरबी सहज निघून जाते. अशा प्रकारे ओवा वजन कमी करण्यासाठी मदत करते.

  • बडीशेप बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त

बडीशेप स्वतःच एक अतिशय पदार्थ आहे. ज्याचे सेवन पचन सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी केले जाते. वास्तविक, उच्च फायबरसह, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखी खनिजे एका बडीशेपमध्ये आढळतात. या पोषक तत्वांमुळे बडीशेपचे सेवन पोटासाठी खूप फायदेशीर ठरते. विशेषतः जर ते दररोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केले जाते.

  • पोटाच्या समस्यांवर हिंग रामबाण उपाय

पोटासंबंधित समस्यांवर हिंग हा एक रामबाण उपाय मानला जातो. यामध्ये फायबरसोबतच त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. ते अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हिंग खाल्ल्यास पोटदुखी, गॅस आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.या चार गोष्टी पोटासाठी आणि पचनासाठी खूप फायदेशीर आहेत आणि म्हणूनच त्यांचे एकत्र सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT