अनेक लोक वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. योग्य खाणे आणि निरोगी दिनचर्या असेल तर वजन वाढण्यावर नियंत्रण ठेवता येते. पण जेव्हा आपण बाहेरचे खातो तेव्हा अनेकदा आपल्याला वजन वाढण्याची चिंता वाटते.
काही लोकांना वजन कमी करायचे असते, परंतु ते स्वतःला बाहेरचे अन्न खाण्यापासून रोखू शकत नाहीत. अशावेळी त्यांचे वजन वाढू लागते आणि पचनाशी संबंधित समस्याही दिसू लागतात.
निरोगी राहण्यासाठी घरी शिजवलेले पदार्थ सर्वोत्तम आहे. परंतु तरीही निरोगी दिनचर्या आणि आहारासह आपण कधीकधी बाहेरचे पदार्थ खातो. पण बाहेरचे पदार्थ खाताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास वजन नियंत्रणात राहते.
तज्ज्ञांनी सुचविलेल्या 4-3-2-1 नियमाचे पालन केल्यास बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानंतरही तुमचे वजन वाढणार नाही आणि तुमची पचनसंस्था देखील सुरळित कार्य करते.
बाहेर जेवताना तुमच्या आवडत्या गोड पदार्थांचे 4 चमचे खावे. यामुळे तुमची लालसा पूर्ण होईल आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल.
जेव्हा तुम्ही बाहेर जेवता तेव्हा झोपायच्या 3 तास आधी जेवण करावे. लगेच जेवण करून झोपणे टाळावे.
रात्री जेवणानंतर जरा फिरायला जावे. तुम्ही घरी जेवत असाल तरीही त्यानंतर किमान 100 पावले चालावे.
तुमचे वजनही कमी होईल आणि पचनसंस्था चांगली राहील.
जेव्हा तुम्ही बाहेर जेवता तेव्हा तुमच्या प्लेटमध्ये प्रथिने आणि फायबर असणे आवश्यक आहे.
तुमची आवडते मिष्टान्न खाण्यापूर्वी सॅलेड खावे आणि नंतर प्रोटीन खावे. प्रोटीनमध्ये तुम्ही चीज, चिकन, टोफू, मासे आणि अंडी याचा समावेश करू शकता.
यानंतर तुम्ही मिष्टान्न खाऊ शकता. याच्या मदतीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते.
या टिप्ससह तुम्ही आठवड्यातून एकदा बाहेरचे पदार्थ खाल्ले तर तुमचे नुकसान होणार नाही.
पोट फुगणे टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी पाण्यात उकळलेले आलं टाकून प्यावे. यामुळे सूज आणि अपचन दूर होईल.
यासाठी आठवडाभर हेल्दी फूड खाणेही महत्त्वाचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.