Morning Breakfast  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Morning Breakfast: सकाळी किती वाजता नाश्ता करावा? जाणून घ्या योग्य वेळ

सकाळी नाश्ता करणे खुप महत्वाचे आहे. सकाळी रिकाम्यापोटी जास्त वेळ राहिल्यास पित्त वाढू शकते.

Puja Bonkile

Right Time for Breakfast in the Morning: सकाळी नाश्ता करणे आरोग्ययासाठी फायदेशीर असते. कारण सकाळी नास्ता नागी केला तर अनेक समस्या उद्भवू शकतात.

आहारतज्ञांच्या सकाळी रिकाम्या पोटी जास्त वेळ राहू नये. कराण रात्री जेवणानंतर किंवा उपवासानंतर तुम्ही दिवसाची सुरूवात पोषक, प्रथिनेयुक्त पदार्थांनी केली पाहिजे.

जर तुम्ही पोषक तत्वांनी युक्त नाश्ता केला तर तुमची पचनक्रिया सुरळित कार्य करते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते.

तुम्ही दिवसभर उत्साही राहता आणि एकाग्रतेने काम करता. इतकंच नाही तर वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

  • नाश्ता न केल्यास होणारे नूकसान

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही नाश्त्यामध्ये कोणत्या पदार्थांचे सेवन करता? जर्नल न्यूट्रिशन अँड मेटाबॉलिझममध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, कोणत्याही वेळी नाश्ता करणे शरीरासाठी चांगले नाही.

यामुळे तुमच्या पोटात किंवा पचन प्रक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतो. यामध्ये शरीरातील इन्सुलिनमध्ये बदल होऊ शकते. यामुळे टाइप 2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि लठ्ठपणा यासारखे आजार वाढू शकतात.

  • रात्रीच्या जेवणानंतर किती तासांनी सकाळी नाश्ता करावा?

नाश्ता करण्याची योग्य वेळ म्हणजे तुम्ही रात्री जेवल्यानंतर १२ तासांनी नाश्ता करावा. 12 तासांचा उपवास बहुतेक लोकांसाठी चांगले आहे. झोप आणि उपवासामुळे शरीराला योग्य आराम मिळते.

शरिराची योग्यता पाहून तुम्ही नाश्ता करू शकता. तर काही लोक 14 किंवा 16 किंवा 18 तासांपर्यंत नाश्ता करतात. कारण त्यांना ही वेळ याग्य वाटते. यामुळे शरिर आणि मनाला देखील फायदा मिळतो.

  • नाश्ता न केल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो

'जर्नल ऑफ कार्डिओव्हस्कुलर डेव्हलपमेंट अँड डिसीज' मध्ये पब्लिश झालेल्या संशोधनानुसार, अमेरिका आणि जपानमधून पब्लिश झालेल्या काही डेटाचा या अहवालात समावेश करण्यात आला आहे.

नाश्ता न केल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो असे आढळून आले.तसेच ते तुमच्या मृत्यूचे कारण देखील बनू शकते. पण नाश्ता करणे म्हणजे काहीही खाणे नव्हे. नाश्तामध्ये अंडी, फळ, ओट्स, एक ग्लास गाय किंवा बदामाचे दूध यासारख्या पोषक घटकांचा समावेश करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT