Underweight can cause 5 health issues: लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या आहे. ही समस्या अनेक लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार, मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढत आहे. या सर्व आजारांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला आयुष्यभर औषधांचा आधार घ्यावा लागतो.
पण याचा अर्थ असा नाही की बारिक असणे आरोग्यासाठी चांगले आहे. कारण जास्त वजन कमी करणे देखील खूप शरिरासाठी धोकादायक असू शकते. यामुळे 5 धोकादायक आजार देखील होऊ शकतात. मग प्रश्न असा पडतो की वजन किती असावे?
शरीराची लांबी आणि वजन यांच्या गुणोत्तरावरून बॉडी मास इंडेक्स काढले जाते. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, निरोगी बीएमआय 18.5 ते 24.9 दरम्यान असतो. यापेक्षा कमी वजन असलेल्यांना अंडरवेट म्हणतात.
कुपोषण
जास्त बारिक झाल्यामुळे शरीरात पोषक घटकांची कमतरता निर्माण होते. यालाच कुपोषण म्हणतात. यामध्ये अशक्तपणा, थकवा, टक्कल पडणे, त्वचा कोरडी पडणे, दात कमजोर होणे अशी लक्षणे दिसू शकतात.
कमजोर रोगप्रतिकारशक्ती
अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की कमी वजन असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. त्यामुळे हवामान बदलल्यावर किंवा व्हायरस इंफेक्शनला असे लोक लगेच बळी पडतात.
हाड कमजोर होणे
वजन कमी असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता देखील होऊ जाणवू शकते. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस रोग होऊ शकतो. यामध्ये हाडांची जाडी कमी होऊन फ्रॅक्चरचा धोका वाढतो.
इनफर्टिलिटी
कमी वजन असलेल्या लोकांमध्ये हार्मोन्स असंतुलित असू शकतात. यामुळे इनफर्टिलिटी वाढू शकते. तुम्हीही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर असे करू नका. तुम्हाला यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
उंची वाढणे थांबते
वजन कमी असलेल्या मुलांची वाढ होणे थांबते.यामुळे वेळीच सावध होऊन आरोग्याची काळजी घ्यावी. वजन वाढवण्यासाठी अंडी, फळे,भाज्या यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.