Healthy Hair Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Hair: 'घनदाट अन् लांब केसांसाठी 'हे' व्हिटॅमिन्स फायदेशीर

अनेक महिलांना केस घनदाट आणि लांब असावे असे वाटते.यासाठी अनेक उपाय देखील करतात. पण पाहिजे तसा काही रिझल्ट मिळत नाही.

Puja Bonkile

Healthy Hair: अनेक महिलांना केस घनदाट आणि लांब असावे असे वाटते.यासाठी अनेक उपाय देखील करतात. पण पाहिजे तसा काही रिझल्ट मिळत नाही. पण जर तुमच्या शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असेल तर तुम्ही कितीही घरगुती उपाय केले तरी केसांची वाढ चांगली होणार नाही. व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे केस गळणे, पांढरे होणे, कोरडेपणा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात. पुढील व्हिटॅमिन्सचा आहारात समावेश केल्यास केस घनदाट आणि चमकदार होतील.

व्हिटॅमिन ए 


व्हिटॅमिन ए केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे एक प्रकारचे अँटिऑक्सिडंट व्हिटॅमिन आहे. जे आपल्या शरीराचे आणि केसांचे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करते. फ्री रॅडिकल्स हे ऑक्सिजनचे प्रकार आहेत. जे आपल्या शरीराच्या पेशींना हानी पोहोचवू शकतात. व्हिटॅमिन ए चे सेवन केल्याने केस मजबूत, दाट आणि निरोगी होतात आणि केस गळण्याची समस्या देखील कमी होते. 

व्हिटॅमिन ई


व्हिटॅमिन ई केसांसाठी खुप गरजेचे आहे. हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांच्या पेशींचे संरक्षण करते. मुक्त रॅडिकल्स त्वचेला आणि केसांच्या मुळांना नुकसान पोहोचवू शकतात. यामुळे केस गळतात आणि पांढरे होतात. अशा प्रकारच्या समस्या व्हिटॅमिन ईमुळे दूर करता येतात आणि केस निरोगी, मजबूत आणि चमकदार होतात. 

व्हिटॅमिन बी7


व्हिटॅमिन बी7 हे केसांसाठी अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्व आहे. बायोटिन केसांच्या मुळांना आवश्यक पोषक तत्व प्रदान करते. यामुळे केसांची निरोगी आणि योग्य वाढ होते. इतकेच नाही तर बायोटिन केसांची जाडी वाढवण्यासही मदत करते. ज्यामुळे केस जाड आणि मजबूत होतात. शरीरात बायोटिनच्या कमतरतेमुळे केस पातळ आणि कमकुवत होतात. तसेच केस तुटायला लागतात. हे केसांची वाढ आणि जाडी वाढण्यास मदत करते. 

व्हिटॅमिन सी


हे व्हिटॅमिन कोलेजन तयार करण्यास मदत करते. ज्यामुळे केस मजबूत होतात. व्हिटॅमिन सी हे केसांसाठी महत्त्वाचे जीवनसत्व आहे. हे एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहे. जे केसांना ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून वाचवते. याव्यतिरिक्त, ते शरीरात कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होतात आणि तुटायला लागतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT