Healthy Food: यावेळेत खा दही आणि केळी, आरोग्यास ठरतात लाभदायी  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Healthy Food: यावेळेत खा दही आणि केळी, आरोग्यास ठरतात लाभदायी

केळी आणि दह्याचे सेवन केल्यास आपल्या शरीराचे हाडे मजबूत होऊन त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

दैनिक गोमन्तक

आपल्याला आरोग्य (Health) चांगले ठेवायचे असेल तर कोणत्या पदार्थांचे सेवन कधी करावे याची माहिती असणे आवश्यक आहे. जसे आपल्याला माहिती आहे की कोणत्या पदार्थासोबत काय खाल्ल्याने शरीराला नुकसान होऊ शकते. तर काही पदार्थ सोबत खाल्ल्याने त्याने आरोग्याला (Health) फायदा होतो. दही (curd) आणि केळी (Banana) हे पदार्थ आपल्या आरोग्यासाठी लाभदायी (Health) आहेत. दह्यात प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B6 आणि व्हिटॅमिन B12 मुबलक प्रमाणात असते. तसेच दही (curd) खाल्याने पोटासंबंधीच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. तर केळी (Banana) खाल्ल्याने आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात लोह (Iron) आणि शक्ती (Power) मिळते. या दोन्ही पदार्थामधील घटक पचन संस्था (Digestive system) चांगली ठेवण्यास मदत करते. या पदार्थांचे एकत्रितपणे सेवन नाश्यामध्ये (Breakfast) करू शकतो.

* दही आणि केळी खाण्याची योग्य वेळ

* शरीराला ऊर्जा मिळते

अनेक लोकांना थोडे जरी काम केले की थकवा जाणवतो. यामुळे त्या लोकांनी केळी (Banana) आणि दह्याचे (Curd) सेवन करावे. हे दोन्ही पदार्थ सकाळच्या नाश्यात घेतल्यास आरोग्याला फायदा होतो. तसेच दिवसभर आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. ज्या लोकांमध्ये अशक्तपणा (Weakness) अधिक जाणवतो त्या लोकांनी या पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

* पोटाच्या समस्या दूर होतात

तुम्हाला जर पोटाच्या समस्या असेल तर केली आणि दही या दोन्ही पदार्थांचे सेवन करावे. यासाठी दह्यात केळी आणि सुकामेवे घालून सकाळच्या नाश्यात (breakfast) सेवन करावे. यामुळे आपली पचनशक्ती (Digestion) सुधारण्यास मदत मिळते.

* वजन कमी होते

वजन कमी करण्यासाठी दही आणि केळी उपयुक्त आहेत. कारण यात तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. यामुळे दिवसभर पोट भरलेले राहते. तुम्हाला जर वेगाने वजन कमी (Weight loss) करायचे असेल तर दही आणि केळीचे सेवन करावे.

* हाडे मजबूत होतात

केळीमध्ये असलेल्या तंतुमय पदार्थ दह्यामधील जीवाणुंच्या वाढीस मदत करतात. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात कॅल्शियम (Calcium) मिळते. यामुळे आपल्या शरीराचे हाडे (Strong bones) मजबूत होऊन त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope:नोकरीत सांभाळा,आरोग्याचा विचार करा, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; वाचा तुमची रास काय सांगते?

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

SCROLL FOR NEXT