Tips to Say Goodbye in a Relationship: अनेक लोकांना नात्यात ब्रेकअप करणे कठिण होते. जबरदस्तीने नाते जोडणे किंवा नको असलेले नाते टिकवणे हे सर्वात कठीण काम असते. याचा तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास होउ शकतो. जे लोक तणावग्रस्त असतात ते आनंदी लोकांपेक्षा जास्त आजारी असतात.
म्हणूनच हे महत्वाचे आहे की जेव्हा तुम्हाला हे समजते की तुम्ही नाते पुढे चालू ठेवू शकणार नाही, तेव्हा पुढे जाण्यास हरकत नाही. तुम्हाला मदत करण्यासाठी येथे ब्रेकअप टिप्स सांगणार आहोत.
मोकळे बोलावे
जर तुम्ही स्वतःहून ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा संभाषण टाळणे या दोघांनाही त्रास होईल.
म्हणूनच त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला की तुम्हाला ब्रेकअप का करायचे आहे की नाते टिकवायचे नाही. जोडीदाराचा संयम सुटू शकतो. त्यामुळे संभाषण अचानक थांबवण्याऐवजी, मोकळे बोलावे.
हळुहळु नात्यातुन बाहेर पडा
अनेक वेळा ब्रेकअपचा निर्णय घेताच लोक बोलणे बंद करतात. सोशल मिडियावर बॉल्क करतात. त्यामुळे त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे त्यांच्यासाठी अधिक कठीण होते. निरोगी ब्रेकअपसाठी ब्रेकअप प्रक्रिया देखील निरोगी करणे आवश्यक आहे.
कारण वर्षांची जोड एका दिवसात संपवता येत नाही. शांतता आणि नियंत्रणासह या प्रक्रियेस वेळ देणे महत्वाचे आहे.
एकमेकांच्या अडथळा बनु नका
जर तुम्हाला एक्ससोबत संपर्क अजिबात न संपवता मैत्रीचे नाते जपायचे असेल तर त्याच्या आयुष्यात अडथळा बनण्याचा प्रयत्न करू नका. ते कोणाशी भेटत आहेत, संबंध निर्माण करत आहेत किंवा बोलत आहेत, तुम्ही यापुढे या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करू नका. तसेच, जर तुम्ही नवीन नात्याची सुरुवात करत असाल तर तुमच्या नवीन नात्याची भूतकाळाशी तुलना करू नका. कारण या गोष्टी तुम्हाला त्यांची आठवण करून देण्याचा प्रयत्न करतील.
तुमची मर्यादा सेट करा
जर तुम्ही रिलेशनशिपमधून मैत्रीकडे जाण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला तुमची मर्यादा निश्चित करावी लागेल. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका. तसेच, त्यांचे सामाजिक प्रोफाइल वारंवार तपासणे किंवा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणे यासारख्या गोष्टी करू नका.
ब्रेकअपचे कारण स्पष्ट ठेवा
ब्रेकअपपूर्वी त्यांचे कारण ठरवणे खूप गरजेचे आहे. कारण जर तुम्ही गोंधळात राहिलात तर तुम्ही पुन्हा नात्यात (Relationship) शिरण्याचा प्रयत्न करू शकता. तुमच्या एक्ससोबत असलेली अटॅचमेंट तुम्हाला पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. पण जर ब्रेकअप होण्यामागे ठोस कारण असेल तर तुम्ही दोघेही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकाल
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.