Stuffed Oats Chilla Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Breakfast Recipe: ब्रेकफास्टमध्ये स्टफ्ड ओट्स चीलाचा घ्या आस्वाद

Healthy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट करायचा विचार करत असला तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

दैनिक गोमन्तक

रोज सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा महिलांना नेहमीच प्रश्न पडतो. पण सकाळी आरोग्यदायी नाश्ता करायचा विचार करत असाल तर तुम्ही स्टफ्ड ओट्स चीला ट्राय करु शकता. ओट्सचे पीठ आणि भाज्यांच्या स्टफिंगने बनवलेला हा चीला खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही अगदी सोपा आहे.चला तर मग जाणून घेउया याची रेसिपी.

स्टफ्ड ओट्स चीला बनवण्यासाठी साहित्य

  • 1 कप ओट्स पावडर

  • 2 टीस्पून बेसन

  • 1 टीस्पून तेल

  • 1/2 कप चिरलेल्या हिरव्या मिरच्या

  • 1 कप पाणी

  • 1/2 टीस्पून हळद

  • 1/2 टीस्पून हिंग

  • चिरलेली कोथिंबीर

  • चवीनुसार मीठ

  • 3 टीस्पून तेल

भाज्यांच्या स्टफिंगसाठी लागणारे साहित्य

  • 1/2 कप हिरवे वाटाणे (उकडलेले)

  • 1/2 कप बटाटे (उकडलेले आणि चिरलेले)

  • 1/2 टीस्पून तेल

  • 1 टीस्पून बारीक चिरलेला कांदा

  • 1 टीस्पून बारीक चिरलेले टोमॅटो

  • 1 टीस्पून हळद

  • 1/2 टीस्पून गरम मसाला

  • तिखट

  • चिमूटभर हिंग

  • चवीनुसार मीठ

  • चिंचेची चटणी

  • स्टफ्ड ओट्स चीला बनवण्याची पद्धत

स्टफड ओट्स चीला बनवण्यासाठी सर्वात पहिले स्टफिंग बनवून घ्यावे. त्यासाठी एका कढईत तेल गरम करून त्यात हळद, गरम मसाला, हिंग, कांदा, टोमॅटो घालून अर्धा मिनिट परतून घ्यावे. यानंतर मटार, बटाटे, चवीनुसार मीठ आणि तिखट घालून 2 मिनिटे शिजवा. यानंतर एका भांड्यात बेसन, हिरवी मिरची, हिंग, धने, हळद, ओट्स पावडर, तेल, पाणी आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल (Oil) गरम करून त्यात चीलाचे मिश्रण टाकून त्याला गोल आकार द्यावे. दुसऱ्या बाजूने पलटून दोन्ही बाजूंनी भाजण्यासाठी ठेवा. चीलामध्ये स्टफिंग टाका, घडी करून पॅनमधून बाहेर काढा. हे तयार स्टफ केलेले ओट्स चीला चिंचेच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT