Winter Skin Care Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात चहा, कॉफीसारखे गरम पेय का टाळावेत?

Skin Care Simple Hacks: आता यापुढे किमान तीन महिन्यांसाठी आपल्याला या थंडीचा सामना करावा लागणार आहे. मग का शरीरावर हे अत्याचार होऊ देणार आहात?

Akshata Chhatre

Simple Skin Care Tips in Marathi

सध्या सगळीकडेच थंडीचे वातावरण आहे. हवेत गारवा वाढल्याने आपोआप शरीराला रुक्षपणा जाणवायला सुरुवात होते. चेहरा सुकतो, ओठ फुटतात.अंघोळ केल्याकेल्या तर अनेकवेळा तुम्हाला देखील शरीर ओढल्याच्या तक्रारी जाणवल्या असतील. आता यापुढे किमान तीन महिन्यांसाठी आपल्याला या थंडीचा सामना करावा लागणार आहे. मग का शरीरावर हे अत्याचार होऊ देणार आहात? नाही. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत जेणेकरून शरीराला हिवाळ्याच्या गारव्यात देखील निरोगी किंवा हेल्दी ठेवता येईल, चला जाणून घेऊया..

गरम पाण्याचा वापर कमी करा:

साहजिकपणे बाहेर गारवा वाढला म्हणजे आपल्याला उबदार वातावरण हवंहवंसं वाटतं. मग आपण गरम पाणी पितो, गरम पाण्याची अंघोळ करतो, उबदार कपडे वापरतो. ठीक आहे मात्र गरम पाण्याने पुन्हा पुन्हा अंघोळ करू नका. गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीरातील रुक्षता वाढते. यापेक्षा कोमट पाण्याने अंघोळ करा. अंघोळ करण्यापूर्वी थोडंसं तेल लावा यामुळे शरीरातील मोइशुराईझींग कायम राहायला मदत मिळते.

सनस्क्रीनचा वापर थांबवू नका:

थंडीच्या दिवसांमध्ये आपण सनस्क्रीनचा वापर थांबवतो. पण थंडीच्या दिवसांत सूर्य अजिबातच नसतो असा होतो का? नाही. याकाळात सूर्य किरणं आपल्या त्वचेवर थेट परिणाम करण्याचे प्रमाण अधिक असते म्हणून सनस्क्रीनचा वापर थांबवू नका.

भरपूर पाणी प्या:

सर्दीच्या दिवसांत पाणी पिणं आपोआप कमी होतं हे लक्षात घ्या, मात्र याचा अर्थ तुमच्या शरीराला पाण्याची गरज नाही असा होत नाही.

थंडीपासून वाचण्यासाठी आपण चहा, कॉफी यांसारख्या पेयांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषण मिळत नाही उलटं पाण्याची अधिक गरज वाटायला लागते.

आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करा:

थंडीच्या दिवसांमध्ये आपण काय खातो हे देखील महत्वाचं असतं. या काळात अधिक फळं आणि भाज्या खाल्ल्याने त्वचा टवटवीत राहायला मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

खेळणं म्हणून एक वर्षाच्या मुलाने किंग कोब्राचा घेतला चावा; सापाचा मृत्यू, बाळ सुरक्षित

चप्पलने बडवेन! दिल्लीत मुख्यमंत्री सिद्धरामया आणि शिवकुमार यांचे OSD भिडले; सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

Shocking Video: चावी फिरवत आली अन् क्षणातच चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीच्या मुलीनं शाळेतच संपवलं आयुष्य, पाहा थरारक व्हिडिओ

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

SCROLL FOR NEXT