World Mental Health Day: कामाच्या व्यापात मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताय का?

गोमन्तक डिजिटल टीम

मानसिक आरोग्य दिवस

आज जगभरात मेंटल हेल्थ डे म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जातोय. आनंदाची बाब म्हणजे हळूहळू आपल्या समाजात मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होत आहे.

जागतिक मानसिक आरोग्य महासंघ

जागतिक मानसिक आरोग्य दिनाची स्थापना 1992 मध्ये जागतिक मानसिक आरोग्य महासंघाने (WFMH) केली आणि यादिवशी मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता पसरवणारे, मानसिक आरोग्याशी संबंधित चुकीच्या संकल्पना मोडून काढणारे उपक्रम राबवले जातात.

मानसिक प्रश्न

मानसिक आरोग्यदिनामुळे अनेकांमध्ये मानसिक प्रश्नांबद्दल उघडपणे बोलण्याचं धाडस निर्माण व्हायला मदत होते.

Mental Health At Work

यंदा जागतिक मानसिक आरोग्यदिनाची थीम 'Mental Health At Work' अशी आहे. कामाच्या ठिकाणी लोकांच्या मनावर काय परिणाम होऊ शकतात यावर भाष्य केले जात आहे.

थेट परीणाम

शारीरिक आरोग्यप्रमाणेच मानसिक आरोग्याचे महत्व फार आहे. आपण दररोज जे आयुष्य जगतो, जे विचार करतो किंवा ज्या वातावरणात वावरतो त्याचा थेट परीणाम मानसिक आरोग्यावर दिसून येत असतो.

एक गंभीर विषय

कामाच्या ठिकाणी आजकाल वर्कस्ट्रेसमुळे अनेक आजार निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हा नक्कीच एक गंभीर विषय ठरू शकतो.

दैनंदिन जीवन

दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्य नीट राहण्यासाठी व्यायाम,ध्यानधारणा, काहीसा निवांत वेळ, पुरेशी झोप आणि आरोग्यवर्धक जेवण ते देखील वेळच्यावेळी करणं फारच महत्वाचं आहे.

आणखीन बघा