Health Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health Tips: तणावाला करा गुडबाय! दिवसाची सुरुवात करा 'या' 5 सकारात्मक उपायांनी

Healthy Life: दैनंदिन आयुष्यात धावपळ, जबाबदाऱ्या आणि सततचे बदल हे अनेकदा मनावर आणि शरीरावर ताण आणतात. तणावाचे दीर्घकाळ परिणाम आरोग्यावर घातक ठरू शकतात.

Sameer Amunekar

दैनंदिन आयुष्यात धावपळ, जबाबदाऱ्या आणि सततचे बदल हे अनेकदा मनावर आणि शरीरावर ताण आणतात. तणावाचे दीर्घकाळ परिणाम आरोग्यावर घातक ठरू शकतात. जसे की उच्च रक्तदाब, निद्रानाश, चिडचिड, नैराश्य, किंवा अगदी मानसिक थकवा. मात्र, आपल्या दिवसाची योग्य सुरुवात केली तर हा तणाव नक्कीच कमी करता येतो.

सकाळचे पहिले काही तास हे आपले संपूर्ण दिवस ठरवतात, आणि म्हणूनच 'सकारात्मक दिवसाची सुरुवात' ही फार महत्त्वाची ठरते. तणावमुक्त दिवसासाठी येथे दिले आहेत प्रभावी आणि सकारात्मक उपाय, जे तुमच्या सकाळची सुरुवात ऊर्जा, समाधान आणि आत्मविश्वासाने करू शकतील.

ध्यान

सकाळी उठल्यानंतर फक्त १०-१५ मिनिटे ध्यान करणे किंवा श्वसनाच्या क्रिया (प्राणायाम) केल्याने मेंदू शांत होतो. यामुळे विचारांची गर्दी कमी होते आणि तुम्ही आतून स्थिर आणि सकारात्मक वाटायला लागता. साधे 'अनुलोम-विलोम', 'भ्रामरी' किंवा 'डीप ब्रीदिंग' प्रकार वापरून सुरुवात करा.

लिखाण

दररोज सकाळी किमान ३ गोष्टी लिहा ज्या तुम्हाला आनंद देतात किंवा ज्या गोष्टींसाठी तुम्ही आभारी आहात. ही सवय तुम्हाला जगाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवते. यातून नकारात्मक विचारांची जागा हळूहळू सकारात्मक विचार घेतात.

चालणे

सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ फिरणे, चालणे किंवा फक्त बसून नैसर्गिक प्रकाशात राहणे – हे तुमच्या शरीरात ‘सेरोटोनिन’ हॉर्मोन वाढवते. सेरोटोनिन हा आनंदाचा हॉर्मोन असून, नैसर्गिक पद्धतीने मूड सुधारण्यास मदत करतो.

प्रेरणादायी संगीत

सकाळी उठल्यावर हलकं, प्रेरणादायी संगीत ऐकणं किंवा एखादा सकारात्मक पॉडकास्ट ऐकणं – यामुळे तुमचा मूड लगेच हलका आणि उत्साही होतो. नकारात्मक बातम्या, तक्रारी, किंवा गोंधळापासून शक्यतो दूर राहा. "Mindful Mornings" किंवा "The Daily Stoic" यांसारखे पॉडकास्ट चांगले पर्याय ठरतात.

आहार

तणावाचा आणि आहाराचा घनिष्ठ संबंध आहे. सकाळचा पहिला आहार म्हणजे ब्रेकफास्ट – तो पौष्टिक, हलका आणि संतुलित असावा. ओट्स, फळं, बदाम, अंडी किंवा मूग डाळीचा उपमा हे चांगले पर्याय आहेत. कॅफिनयुक्त पदार्थ (उदा. जास्त चहा-कॉफी) कमी प्रमाणातच घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "तो प्रवासी माझाच!" भररस्त्यात सुरू झाली रिक्षावाल्यांची 'WWE'; प्रवाशाने ठोकली धूम, व्हिडिओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

Cricket Rules: 100 मीटरच्या षटकाराला 8 धावा, 3 विकेट्स घेणाऱ्याला एक्स्ट्रा ओव्हर; क्रिकेटच्या नियमांमध्ये होणार मोठे बदल?

Goa Accident Death: मॉर्निंंग वॉक दरम्यान काळाचा घाला; पत्रादेवी येथे 65 वर्षीय वृद्धाला कंटेनरने चिरडले, चालकाला रत्नागिरीतून अटक

Horoscope: लक्ष्मीच्या आशीर्वादाने शुक्रवार ठरणार खास; 'या' राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार! उत्पन्नात होणार प्रचंड वाढ

लिव्ह-इन पार्टनर परतली नवऱ्याकडे, प्रियकराची याचिका फेटाळत कोर्टानं झापलं; म्हणाले, 'अशा नात्यांना कायद्याचं कवच देता येणार नाही'

SCROLL FOR NEXT