Manish Jadhav
उन्हाळ्यातील उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी लोक अनेकदा फळे खाण्याचा सल्ला देतात. उन्हाळ्यात पीच या फळाचे मोठ्याप्रमाणात सेवन केले जाते.
उन्हाळ्यात पीच या फळाचे नियमितपणे सेवन केल्यास शरीर हायड्रेटेड राहते.
पीचमध्ये असलेले फायबर आणि व्हिटॅमिन सी पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करते. शिवाय, पोटाच्या समस्यांपासूनही हे फळ आराम देते.
पीच हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
पीचमध्ये फायबर आणि पाणी जास्त असते, जे वजन कमी करण्यास मदत करते आणि भूक नियंत्रित करते.
पीचमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा आणि केस निरोगी आणि चमकदार बनवतात.