Manish Jadhav
अनेक औषधी वनस्पती अनेक आजारांवर रामबाण उपाय आहेत. त्यापैकीच एक कढीपत्ता आहे.
आज (9 मे) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून केसांसाठी कढीपत्ता किती फायदेशीर ठरतो याबाबत जाणून घेणार आहोत...
केसांच्या नैसर्गिक वाढीसाठी कढीपत्ता फायदेशीर ठरतो. केसांच्या मुळांना पोषण देऊन केसांची वाढ सुधरवण्यात कढीपत्ता मदत करतो.
कढीपत्ता केसांच्या मुळांना बळकट करून केस गळण्याचे प्रमाण कमी करतो.
कढीपत्ता टाळूतील जंतू आणि बुरशी नष्ट करुन त्वचा स्वच्छ ठेवतो.
कढीपत्ता वापरल्यास केस मऊ, मजबूत आणि नैसर्गिकरीत्या चमकदार दिसतात.
कढीपत्ता कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीला थांबवतो आणि टाळू स्वच्छ ठेवतो.