eyes 
लाइफस्टाइल

Health Tips: उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे...

दैनिक गोमंतक

सर्वच जण त्वचेची, केसांची काळजी घेण्याकडे अतिशय लक्ष देतात. तसेच योग्य आहारकडे देखील लक्ष देत असतात. पण उन्हाळ्यामध्ये (summer) आपण नाजुक भाग असलेल्या डोळ्यांची काळजी घेण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. उन्हाळा सुरू झाला की सर्वाना एसी (AC) , कूलरमध्ये राहायची, आइस क्रीम( Ice- Crime) खायची, पाताळ,हलके आणि शीत रंगाचे कपडे घालण्याची गरज वाटू लागते. उन्हाळ्यात बाहेर न पडत घरातच थाबण्याची इच्छा होते. परंतु आपण डोळे या अतिमहत्वाच्या अवयवकडे बरेचदा दुर्लक्ष करतो. वातावरणातील तापमान (Temperature) वाढले की अनेक आजार डोकेवर काढतात आणि त्यामुळे डोळ्यांची अधिक काळजी घेणे महत्वाचे आहे. डोळ्यांची काळजी (Eye care) कशी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची माहिती करून घेऊया. (health tips Need to take care of your eyes in summer)

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी :
* दिवसभरातून डोळे दोन ते चार वेळ थंड पाण्याने धुतले  पाहिजे.
* डोळ्याना कमीत कमी सात  तासांची झोप गरजेची आहे. 
* घरातून बाहेर पडतांना उन्हापासून रक्षण होण्यासाठी युव्हि प्रोटेक्शन  सनग्लाससेसचा  वापर करावा. 
* रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. 
* ज्यास्त प्रमाणात पाणी पिले पाहिजे. 
* सकाळी किंवा संध्याकाळी हिरव्या गवतावर अनवाणी पायाने फेरफटका मारला पाहिजे. 
* उन्हाळ्यात अनेकांचे डोळे कोरडे पडतात. तेव्हा भरपूर पाणी, पाणीदार फळ खाल्याने डोळ्यातील कोरडेपणा कमी पडण्यास मदत होते. डोळ्यांचा निसर्गिक ओलावा कायम राहण्यासाठी आय ड्रॉप किंवा इतर पर्यायी 
घटक वापरू शकतो. उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर केल्याने डोळ्यातील कोरडेपणा आणि संसर्ग दूर ठेवण्यास मदत होते. 
* गाजर, काकडी, पपई यामध्ये  व्हिटेमिन ए  मुबलक प्रमाणात असते त्यामुळे या फळांचा आहारात समावेश करावा. 

या सोप्या उपायांमुळे  डोळ्यातील  उष्णता कमी होण्यास मदत होते. डोळ्यातील वाढत्या उष्णतेमुळे अनेक नेत्रआजाराना सामोरे जावे लागेल. म्हणून याकडे विशेष लक्ष्य दिले पाहीजे. तसेच आहारातील गरम मसाला, अंबावलेले पदार्थ,अति खारट पदार्थ, यांचा सतत वापर टाळावा. त्याएवजी लोणी, दूध, तुळशी, गुलकंद, पुदिना, इत्यादींचा आवर्जून आहारात संवेश करावा.      

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT