Vitamin D Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Vitamin D: भारतातील 76 टक्के लोकांमध्ये 'व्हिटॅमिन डी' ची जाणवते कमतरता; वेळीच घ्या काळजी

Vitamin D Deficiency: 25 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा सर्वाधिक फटका बसतो.

दैनिक गोमन्तक

Vitamin D Deficiency:  धावपळीच्या काळात निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरात सर्व आवश्यक पोषक तत्व असणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते.

अनेक वेळा पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे लोकांना गंभीर आजारांनाही सामोरे जावे लागते. नुकत्याच एका सर्व्हेक्षणातून असे समोर आले आहे की, भारतातील 76 टक्के लोकसंख्येमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आढळून आली आहे.

हा डेटा भारतातील (India) सुमारे 27 शहरांमध्ये राहणाऱ्या 2.2 लाखांहून अधिक लोकांच्या चाचणीवर आधारित आहे. सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की 25 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना याचा सर्वाधिक त्रास होतो.

चाचणीमध्ये 79 टक्के पुरुष आणि 75 टक्के महिलांचा (Women) समावेश होता. सुरतमधील 88 टक्के आणि वडोदरातील 89 टक्के लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत. याशिवाय दिल्ली-एनसीआरमधील 72 टक्के लोकांमध्ये या व्हिटॅमिनची (Vitamin) कमतरता आढळून आली. या जीवनसत्त्वाची कमतरता तरुणांमध्ये सर्वाधिक दिसून आली. 25 वर्षांपर्यंतच्या 84 टक्के तरुणांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळून आली. 25-40 वयोगटातील 81 टक्के लोकांमध्ये अशी परिस्थिती दिसून आली.

  • व्हिटॅमिन डीची

व्हिटॅमिन डी ला सनशाईन व्हिटॅमिन असेही म्हटले जाते. मजबूत प्रतिकारशक्ती, हाडांची ताकद, मानसिक आरोग्य (Mental Health) , स्नायू आणि पचनसंस्था यासाठी हे जीवनसत्व खूप महत्वाचे आहे.

जेव्हा एखाद्याला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी शरीराला मिळत नाही, तेव्हा त्याची कमतरता कालांतराने वाढत जाते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आरोग्यावर (Health) अनेक वाईट परिणाम होतात.

  • व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारे परिणाम

मधुमेह

नैराश्य

संधिवात

प्रोस्टेट कर्करोग

  • व्हिटॅमिन डीची कमतरता कशी दूर करावी?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत.

व्हिटॅमिन डीने युक्त असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. जसे की फॅटी फिश, मशरूम, डेअरी, अंडी, लाल मांस यांचा आहारात समावेश करावा.

सूर्यप्रकाश घेतल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता देखील दूर होते. दिवसातून दोनदा 30 मिनिटे चेहरा, पाठ आणि पायांवर सूर्यप्रकाश घ्या.

व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT