Superfood Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Health In Winter: हिवाळ्यात फिट राहण्यासाठी या सुपरफूडचे करावे सेवन

Health In Winter: हिवाळ्यात रोज खजूर खाल्ल्यास किंवा दुधासोबत खाल्ल्यास सर्दी-खोकल्याचा त्रासही दूर होतो.

दैनिक गोमन्तक

Health In Winter: बदलत्या ऋतुनुसार आपल्या दैनंदीन आयुष्यातदेखील अनेक बदल करावे लागतात. आपल्या खाण्यापिण्यातदेखील अनेक बदल करावे लागतात. असे म्हटले जाते त्या-त्या ऋतुनुसार त्या-त्या ठिकाणी मिळणाऱ्या फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत. आज आपण जाणून घेणार आहोत थंडीच्या दिवसात खजूर खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत.

सर्दीपासून सुटका

हिवाळ्यात अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. त्यामुळे सर्दी होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही या समस्येचा सामना करत असाल तर तुम्ही थंडीच्या ऋतुत खजूर खाणे महत्वाचे आहे. हिवाळ्यात रोज खजूर खाल्ल्यास किंवा दुधासोबत खाल्ल्यास सर्दी-खोकल्याचा त्रासही दूर होतो. यातील अनेक पोषक घटक शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

मधुमेह नियंत्रणात

काही लोकांना हिवाळ्यात मिठाईची खूप इच्छा असते. अशा परिस्थितीत जे मधुमेहाचा सामना करत आहेत ते हवे तसे गोड खाऊ शकत नाहीत कारण साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. पण खजूर हे असे ड्रायफ्रूट आहे की रोज खाल्ल्यास मधुमेहाच्या रुग्णांना कोणताही त्रास होत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खजूर खूप फायदेशीर आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित

हिवाळ्यात तापमान कमी असल्याने रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकसतात. त्यामुळे शरीरात रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही. अशा स्थितीत रक्तदाब वाढतो. हिवाळ्यात उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दररोज खजूर खा. कारण खजूरमध्ये पोटॅशियम भरपूर असते. अशा प्रकारे, थंडीच्या दिवसात आपण आपल्या आरोग्याची उत्तमप्रकारे काळजी घेऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

IFFI 2024: इफ्फीत काय आणि कुठे पाहाल? संपूर्ण माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa Government Jobs: 'निवड आयोगा'तर्फे विविध खात्‍यांतील रिक्‍त पदांची भरती! 24 तासांत लागणार निकाल

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

SCROLL FOR NEXT